नांदेड : नांदेड येथील झुंझार आणि लढाऊ कामगार नेते कॉ.गंगाधर गायकवाड यांना ‘रयत’चा यावर्षी दिला जाणारा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्या पुरस्काराचे वितरण दिनांक १२ नोव्हेंबर रोजी नायगाव तालुक्यातील सुजलेगांव येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यक्रमात होणार असून कॉ.गायकवाड यांना पुरस्कार जाहीर झाल्याने कामगार – कष्टकऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सीटू संलग्न असंघटित, घरेलू,आशा,मजदूर आणि हौकर्स युनियनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉ.गंगाधर गायकवाड हे मागील दोन दशकापासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिले असून ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य तथा पक्षाचे शहर सेक्रेटरी आहेत. तसेच देशातील नामांकित व लढाऊ कामगार संघटना सी.आय.टी.यू चे ते जिल्हा सरसिटणीस व राज्य कमिटी सदस्य आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड शहरात झाले असले तरी त्यांनी माहूर तालुक्यातून पक्षाचे काम सुरु केले होते.सन २००५ मध्ये माहूर पंचायत समिती तोडफोड प्रकरणामध्ये त्यांना हद्दपार केल्यामुळे ते नांदेड शहरात स्थायिक झाले.
त्यांनी सन २००६ नांदेड बॉम्ब स्फ़ोटाची सीबीआय चौकशी करण्यासाठी पुढाकार घेतला होता व मागणी केली होती आणि ती चॊकशी झाल्यानंतर अनेक आरोपीना अटक करण्यात आली आहे.
सन २००९ मध्ये कॉ.गायकवाड यांनी ‘पेड न्यूज’ आर्टिकल ‘द हिंदू’ साठी २४ तासाच्या आत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवडणूक खर्चाची माहिती आर.टी.आय.मध्ये प्राप्त करीत रेमन मेगासेसे पुरस्कार विजेते,माजी राष्ट्रपतीचे नातू तथा द हिंदूचे कार्यकारी संपादक आंतरराष्ट्रीय पत्रकार पी.साईनाथ यांना उपलब्ध करुन दिली होती. आणि तेव्हा पेड न्यूज प्रकरण देशभर गाजले होते.त्यामुळे कॉ.गायकवाड यांना राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली होती.
त्यांनी अनेक आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले असून अनेक पीडिताना न्याय मिळवून देण्यासाठी आपला पूर्ण वेळ दिला आहे.
आंदोलनाच्या केसेसमध्ये ते कारागृहात देखील राहून आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील बोगस दस्त नोंदणी आणि जमीन घोटाळा,पोलीस संरक्षण अशा विविध क्षेत्रातील प्रकरणे त्यांनी उघडकीस आणली आहेत.त्यांच्या तक्रारीमुळे आणि पाठपुराव्याने बेकायदेशीर काम करणाऱ्या शकडो लोकांवर भा.द.वि. प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
लोक डाऊन काळात त्यांनी केलेले कार्य देखील उल्लेखनिय आहे.
त्यांना रयत या नामांकित संस्थेचा या वर्षीचा पुरस्कार जाहीर झाला असून दिनांक १२ नोव्हेंबर रोजी एका भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
म्हणून विविध क्षेत्रातील कामगार बंधू-भगिनींच्या वतीने कॉ.गायकवाड यांचा नांदेड तहसील कार्यालय परिसरात दि.१० नोव्हेंबर २०२२ रोजी सत्कार करून त्यांना कॉ.कुमार शिराळकर लिखित ‘ऊठ वेड्या तोड बेड्या’ पुस्तक देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
कॉ.गंगाधर गायकवाड यांना पुढील कार्यासाठी क्रांतिकारी शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन !