KINWATTODAYSNEWS

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्या बद्दल कॉ.गंगाधर गायकवाड यांना ‘रयत’ चा पुरस्कार जाहीर

नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते तथा सीटू कामगार संघटनेचे नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांना रयतच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार जाहीर झाला असून एका भव्य सोहळ्यामध्ये दिनांक १२ नोव्हेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
रयत सेवाभावी संस्था सुजलेगांव संचलित कालवश रावसाहेब गंगाराम सूर्यकार स्मृती दिनानिमित्त दिनांक १२ नोव्हेंबर रोजी महाकाली मंदिर परिसर, ग्रामपंचायत कार्यालय सुजलेगांव ता.नायगाव येथे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडक मान्यवरांचा सन्मान करून पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये जेएनयू,नांदेड चे प्रा.रावसाहेब दोरवे आणि लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांचे वेगवेगळ्या दोन सत्रामध्ये व्याख्यान होणार असल्याचे आयोजक प्रा.इरवंत सूर्यकार यांनी कळविले आहे.
कोरणाच्या लोकडॉउन काळात जीवाची पर्वा न करता कॉ. गायकवाड यांनी स्थलांतत्रित मजूर आणि अनेक गरजुंना मदत केली आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मागील वर्षी तीन पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शहर कमिटी आणि कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा नांदेड शहरात देखील सत्कार करण्यात येणार आहे..

164 Views
बातमी शेअर करा