KINWATTODAYSNEWS

शेतक-यांनी आपली ई- के.वाय.सी तात्काळ करुन घ्यावी – डॉ मृणाल जाधव तहसिलदार किनवट

किनवट ता.प्र दि ०६ शेतक-यांना वारंवार आवाहन करुन देखील किनवट तालुक्यातील ९२११ शेतक-यांनी अद्यापही आपला ई-के.वाय.सी न केल्याने आगामी काळात त्यांना मिळणारे पीएम – किसान योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो यामुळे पुढील एक आठवड्यात शेतक-यांनी आपली ई- के.वाय.सी करुन घ्यावी असे आवाहन डॉ मृणाल जाधव तहसिलदार किनवट यांनी केले आहे.
केंद्र सरकार ने सन २०१७ पासुन शेतक-यांना वार्षीक ६००० रुपये प्रमाणे २००० हजार रुपयाच्या हप्त्याप्रमाणे अनुदान अशी योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही नियम व अटी लावण्यात आल्या होत्या परंतु सुरवातीला सरसकट शेतक-यांनी या योजने करिता नोंदणी केली होती परंतु नंतर महसुल प्रशासनाव्दारे या योजनेतील नियम व अटी प्रमाणे लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली जसे आयकर भरणारे, नोकरी करणारे, एकाच कुटुंबात अनेकांची नावे, राजकारणी, संवैधानिक पदाचा लाभ घेणारे अशा लाभार्थ्यांना वगळण्यात आले. ती नावे वगळल्या नंतर आता या योजनेच्या पोर्टल मध्ये फक्त शेतक-यांची नावेच शिल्लक राहिलेली आहे. सदर योजनेला पीएम किसान या नावावे ओळखले जात असल्याने या पोर्टलचे नाव हि पीएम किसान असे ठेवण्यात आले आहे. तर किनवट तालुक्यातील ९२११ असे शेतकरी आहे ज्यांचा अजुन ही ई-के.वाय.सी झालेला नाही. त्यांनी येत्या एका आठवड्यात आपली ई-के.वाय.सी करुन घ्यावी असे आवाहन तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.
ई- के.वाय.सी करिता अत्यंत सोपी पध्दत आहे शेतक-यांनी आपल्या जवळच्या सेतु सुविधा केंद्र, सि.एस.सी केंद्र किंवा तहसिल कार्यालयात जाऊन आपला आधार क्रमांक सांगुन नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ.टी.पी नोंदवणे आहे. किंवा ज्यांना ओ.टी.पी ने शक्य नाही अशानी आपल्या हातांच्या ठश्याने ई – के.वाय.सी करावयाचा आहे. ज्या शेतक-यांना शक्य आहे त्यांनी आपल्या मोबाईल किंवा घरातील संगणकावर देखिल पीएम – किसान च्या वेबसाईट वरती जाऊन सोप्या पध्दतीने आपली ई – केवासी करुन घ्यावी.

258 Views
बातमी शेअर करा