KINWATTODAYSNEWS

खा.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे..आ.मोहन अण्णा हंबर्डे

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.5.माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा.राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे प्रतिपादन काँग्रेसचे नांदेड दक्षिण चे कार्यसम्राट आ.मोहन अण्णा हंबर्डे यांनी सोनखेड येथे आज दि. ३ नोव्हेंबर रोजी “भारत जोडो यात्रा” पूर्व मार्गदर्शन बैठकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलताना केले.

केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असुन या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी,झुंडशाही प्रचंड प्रमाणात वाढली असल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा.राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनआंदोलन सुरू केले असून दि. ७ सप्टेंबर २०२२पासुन आपल्या भारत देशाचे शेवटचे टोक असलेल्या कन्याकुमारी पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली असून ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्र व नांदेड जिल्ह्यात दि.७ते १० नोव्हेंबर दरम्यान राहणार असुन यांची जय्यत तयारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होत असुन याचाच एक भाग म्हणून लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदार संघातील सोनखेड येथे आज दिनांक ३ नोव्हेंबर २०२२रोजी सोनखेड सर्कल काँग्रेस कमिटीच्या वतीने “भारत जोडो यात्रा” पूर्व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड दक्षिण चे कार्यसम्राट आ.मोहन अण्णा हंबर्डे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा,माजी जि.प.अध्यक्ष आनंद गुंडले,कार्यक्रमाचे आयोजक तथा काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीनिवास मोरे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मोरे,जि.प. सदस्य मनोहर शिंदे, काँग्रेसचे लोहा तालुका अध्यक्ष रंगनाथ भुजबळ, माजी जि.प. सभापती श्रीनिवास बंडेवार,पं.स. सदस्य कैलास जाकापुरे, नांदेड दक्षीण काँग्रेसचे महासचिव मधुकर पाटील दिघे, सरपंच अण्णाराव पाटील पवार, सरपंच दयानंद येवले,सरपंच प्रकाश नवरे,चेअरमन दत्ता पाटील दिघे,प्रकाश मोरे,ग्रा.पं. सदस्य विलास मोरे,मधुकर पाटील येवले, रामदास पाटील जामगे, सुदर्शन शेबाळे, बापुराव ढवळे, राजू उराडे, केशव वानखेडे,दिलीप मोरे,कैलास मोरे, यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, सोनखेड सर्कल मधील आजी- माजी सरपंच, चेअरमन, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले की, आपल्याला भारतात दाखवायचे आहे की,खा.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला नांदेड मध्ये प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.राहुल गांधी हे ३५०० कि.मी.चालणार आहेत.

माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा वसा घेऊन ते चालत आहेत पायी यात्रा काढत आहेत.७० वर्षात काँग्रेसने देशाला उभे केले आहे देशात रस्ते बांधले, धरणे बांधली,वीज आणली,शेतीला पाणी दिले, उद्योग धंदे उभे केलेत .भाजपाने व एम आय एम ने देश तोडण्याचे काम केले आहे विकास तर कुठलाच केला नाही,जातीवाद करायचा व विकासापासून दूर ठेवायचं ५०-५६ वर्षापासून ईडी कुणालाही माहीत नव्हती . संजय राऊत हे खरे बोलत होते केवळ ८० लाखाचा हिशोब मिळाला नाही म्हणून त्यांना तुरुंगात टाकले आहे.

जे कुणी खरे बोलतो त्याला ईडी लावायची जे गरीबांसाठी लढेल त्यांना तुरुंगात टाकायचे व मोठ्या लोकांचे कामे केले तर त्याला सोबत ठेवायचे.
आपल्याला दि. ७ नोव्हेंबर पासुन या यात्रेत मोठ्या संख्येने सामील व्हायचे आहे. कै.शंकरराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेले विकास कामे व त्यांचे उपकार फेडायचे आहेत. नांदेड ची जनता कै. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांची आहे.

नांदेड चे नाव भारतात गाजवायचे आहे.‌आपले नेते अशोकराव चव्हाण यांचे नाव गाजवायचे आहे.तेव्हा या यात्रेत लाखो लोक सामिल होणार आहेत.नांदेड दक्षीण मधुन २० हजार कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार आहेत. विष्णुपुरी पासून ते कांकाडी पर्यंत लोक राहणार आहेत.
या यात्रेत कमीत कमी २लाख लोक सामील होणार आहे.

मोटारसायकली,जीप,एसटी, भेटेल त्या वाहनाने या भारत जोडो यात्रेत या व ही यात्रा यशस्वी करा . अशोकराव चव्हाण हे पुन्हा मुख्यमंत्री होतील. कै. शंकरराव चव्हाणांनी महाराष्ट्राची तहान भागविली आहे.शेतीला पाणी दिले आहे.

या भारत जोडो यात्रेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा सामिल होणार आहेत.

या भारत जोडो यात्रेचे कांकाडी,देगलुर नाक्यापासुन निघून स्टेडियम येथे सभा होऊन तेथे खा. राहुल गांधी हे मार्गदर्शन करणार आहेत.

मी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार व मी चालणार असा संकल्प करा असे आवाहन आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी केले.
तसेच यावेळी माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, अनिल मोरे, आनंद गुंडले, रंगनाथ भुजबळ आदी चे मार्गदर्शन पर भाषणे झाली.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास मोरे यांनी केले.
सुत्रसंचलन अजय मोरे यांनी केले तर आभार युवक काँग्रेसचे विलास मोरे यांनी मानले.

57 Views
बातमी शेअर करा