किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)
तालुक्यातील किनवट पोलीस ठाणे अंतर्गत बोधडी सर्कल येथील इंजेगाव फाटा येथे गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण मुंबई नावाचा जुगार मटका राजरोस पणे टेन्ट टाकून चालू असून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे.
किनवट पासून 22 किलोमीटर अंतरावर इंजेगाव फाटा तेलंगाना सीमेलगत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण मुंबई नावाचा जुगार राजरोसपणे चालू असून किनवट पोलीस ठाण्यास याची चाहूल न लागणे ही बाब आंधळे दळते आणि कुत्र पिठ खाते या म्हणीप्रमाणे पोलीस ठाणे वागत असल्याचे दिसून येते सदर मटका चालवण्यासाठी पोलिसाकडून मूक संमती असल्याचे दिसून येते या मटक्या मुळे तेलंगणा राज्यातील कोरोना बाधित बहुतांश नागरिक इंजेगाव फाटा येथे दररोज ये-जा करत असून त्यामुळे कोरोना बाधित नागरिकांची तालुक्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून किनवट येथील जागरूक नागरिक या नात्याने पोलीस ठाणे किनवट येथे मटका बंद करण्यासाठी दिनांक 09/06/2021 रोजी तक्रारी अर्ज देऊन मागणी केली असून तक्रारीची एक प्रत उपविभागीय पोलिस अधिकारी यांना सुद्धा देण्यात आली आहे मटका तात्काळ बंद न केल्यास व चालकाविरुद्ध कारवाई न केल्यास पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे