किनवट ता. प्र दि ०५ देशातच नाही तर विदेशातही चर्चील्या जात असलेल्या कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचे चोख व उत्कृष्ठ नियोजन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडुन केले जात आहे. यामध्ये प्रत्येक भारतीयाने सहभाग नोंदवुन यात्रेला यशस्वी करुन करावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष के. मुर्ती यांनी केले आहे.
दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ ते ११ नोव्हेंबर २०२२ दरम्यान भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यातुन जाणार आहे या करिता राज्यातील सर्वच प्रमुख नेते नांदेड मुक्कामी राहणार आहे, तसेच महाविकास आघाडी चे प्रमुख नेते राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सह बहुजन चळवळीतील आंबेडकरवादी पक्षाचे सर्वच प्रमुख नेते त्यांच्या पदाधिका-यांसह भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील नागरीकांना कॉग्रेसच्या लाटेचे दर्शन होणार आहे. कॉग्रेस म्हणजे एक विचार आहे तो संपवणे कोणत्याही राजकिय पक्षाला किंवा नेत्याला शक्य नाही त्यामुळे हि यात्रा देशात एवढ्या लोकांना जोडत आहे व यामुळेच हि एवढी प्रसिध्द आहे यामुळे या प्रवाहात किनवट माहुर तालुक्यातील नागरीकांनी तसेच सर्वपक्षीय पदाधिका-यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरध्यक्ष के. मुर्ती यांनी माध्यमांशी बोलतांना केले आहे.
भारत जोडो यात्रा हि कन्याकुमारी ते कश्मिर पर्यंत पायीचालण्याच्या स्वरुपात संपन्न होणार आहे, देशात फोफावत असलेल्या जातीयतेला थोपवणे हि या यात्रेचे मुख्य उद्देश्य आहे. व्देषाचे राजकारण सोडा आणी प्रेमाचे, सदभावाचे राजकारण करा असा संदेश या यात्रेतुन कॉग्रेस नेते राहुल गांधी देत आहेत. आपला देश विविध जाती धर्मांनी व विविध पंथानी तसेच विविध भाषेने संभाषण करणा-या नागरीकांनी नटलेला आहे. या सुंदर अशा देशात भारतीय जनता पक्षाकडुन व्देषाचे, जातीयतेचे विष पेरले जात असल्याने देशातील सदभाव खराब झाला आहे. यामुळे देशात सदभाव, सलोखा, धर्मनिपेक्षता, संविधान तसेच मानवतेचे मुल्य रुजवण्यासाठी सदर यात्रा मुख्यत्वे कार्य करत आहे. यामुळे संविधानाच्या मुळ उद्द्देशाचे पुनरुज्जिवण याव्दारे कॉग्रेस नेते राहुल गांधी देशात करत आहे.
सदर यात्रा देशातील विविध जाती धर्म व भाषिय राज्यातुन जात आहे, तरी या यात्रेला विविध प्रांतामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये मोठे समर्थन प्राप्त होत आहे. यामूळे देशातील नागरीकांमध्ये या यात्रेच्या माध्यमातुन थेट संवाद होत आहे. अशा या प्रचंड लोकप्रिय यात्रेला किनवट माहुर विधानसभा क्षेत्रातील नागरीकांनी समर्थन देऊन यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष के. मुर्ती यांनी केले आहे. तर आगामी काळात राज्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, महानगर पालिकेत महापौर, तर राज्यातील विविध नगर परिषदामध्ये कॉग्रेसचा नगराध्यक्ष बसणार असल्याचे विश्वास यावेळी माध्यमाशी बोलतांना मुर्ती यांनी व्यक्त केला आहे.
कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत प्रत्येक भारतीयाने सहभाग नोंदवुन यात्रेला यशस्वी करा- माजी नगराध्यक्ष के. मुर्ती
62 Views