किनवट – तालुक्यातील चंद्रपुर-दिग्रस ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवत गावपुढारी बनलेल्या सरपंच उपसरपंच सदस्यांनी नागरीकांच्या सार्वजनिक हिताच्या बाबीकडे लक्ष देवुन विकासकामांचा धडाका एैन दिवाळीत लावला असुन गावात अद्यावत सेनसरचे एलईडी पथदिवे लावण्यात आले आहेत, नाली बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. एकुणच नविन गावपुढाऱ्यांनी नागरी सुविधांकडे लक्ष दिल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत.
गत अनेक वर्षा पासुन चंद्रपुर-दिग्रस ग्रामपंचायत राबलेल्या पुढाऱ्यांच्या हाती होती, अनेक पंचवार्षीकांचा अनुभव असलेले ग्रामस्थ काहीतरी नविन चेहरे समोर आनण्यास आग्रही होते, तरूणांनी कंबर कसली एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले.
नविन गावपुढाऱ्यांच्या मताच फलीत आता ग्रामस्थांना दिसत असुन एैन दिवाळी सणात गावातील रस्त्यावर स्वयंचलीत एलईडी पथदिवे लावण्यात आले आहेत, यामुळे विज बचत होणार असुन पथदिव्यांवरील अधिकचा खर्च कमी होणार आहे, गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नालीबांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
तरूण सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य एकवटून एकादिलान काम करून गावचा विकास साधत असल्याने ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त केल जात आहे.
गावविकासासाठी सरपंच श्रावण मिराशे, उपसरपंच श्रीमती नर्मदाबाई साबळे, यांच्या माध्यमातुन
कर्तार साबळे, बाळू पवार, (पोलीस पाटील) जगसिंग साबळे, अजिंत गुलाबसिंग साबळे, नामदेव कदम, भगवान बामन, नयन साबळे, अवधूत पाटील, शिवाजी जाधव, देऊ साबळे, माधव गीते, प्रेमसिंग साबळे, मारुती कवडे, रमेश पडवाळ, प्रेमसिंग पडवाळ, भगवान पडवाळ, ईश्वर साबळे, ईश्वर खसावत, गोपाळ पडवाळ, प्रदीप साबळे, धनराज साबळे, सुभाष ब्रदावल, मनोहर मडावी, नागेश सूर्यभान, ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत.