KINWATTODAYSNEWS

ग्रामिण क्षेत्रातील परीवार सुरक्षिततेसाठी भारतीय आयुर्विमा योजनांचा लाभ घ्या – शाखाधिकारी किशोर डोंगरे

साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ आता ग्रामिण क्षेत्रातील सामान्य परीवारांतील सदस्यांनी घेऊन मुलांचे पुढील भविष्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन भारतीय आयुर्विमा महामंडळ साकोली सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे यांनी ( ता. ०२ नोव्हें.) सिरेगाव बांध येथे रोशन कापगते यांच्या आयोजनात दक्षता जागरूकता अभियांना अंतर्गत गावातील गावकरी बांधवांची आमसभा घेण्यात आली.   


                या सभेत गावातील बहुसंख्य गावकरी बांधवांनी व महिलांनी सभेला उपस्थिती दाखविली होती. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे, सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार हे होते. भारतीय आयुर्विमा महामंडळ साकोली शाखेतर्फे सिरेगाव मध्ये घेण्यात आलेली पहिलीच आमसभा असून या सभेत गावकरी बांधवांना व महिलांना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विविध योजनेअंतर्गत शाखाधिकारी किशोर डोंगरे यांनी सांगितले की सामान्य परीवारांतील आपल्या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी, भविष्यात विद्यार्थ्यांना कोणत्याच आर्थिक मदतीसाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एकुण एक योजनेंतून त्याचा पुरेपूर लाभ त्या विमाधारक मुलामुलींना मिळणार व आता मिळतही आहे. गावकरी बांधवांनी मार्च २०२३ पर्यंत गावातून जास्तीत जास्त भारतीय जीवन विमा अंतर्गत विविध योजनेअंतर्गत पॉलिसी काढून आपल्यांसह आपल्या मुलाबाळांना भविष्यासाठी सुरक्षित करावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात यावर्षी गावातील 3 कुटुंबांचे विमा परिवार झाल्याबद्दल एल आय सी अधिकारी वर्गातर्फे सत्कार करण्यात आले त्यामध्ये यशवंत पचारे, केवळराम पुस्तोडे देवांनाथ नागपुरे यांचा समावेश आहे. तसेच गावातील मान्यवर व्यक्ती व एल आय सी अभिकर्ता लोकपाल गहाने उपस्थित होते. याप्रसंगी सभेचे आयोजन करणाऱ्या रोशन कापगते यांनी एल आय सी अधिकारी वर्गाचा सत्कार करून उपस्थित गावकरी बांधावाचे आभार मानले व सर्व या क्षेत्रातील गावकरी बांधवांनी भारतीय आयुर्विमा पॉलिसी काढावी असे आव्हान केले.

104 Views
बातमी शेअर करा