*” राज्याचा कृषी विकास आराखडा तयार केला जाईल, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी हवेत गोळीबार करून वेळ मारून नेली “*
नांदेड : राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे काळी दिवाळी करावी लागली आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणत आहेत की दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही. त्यांच्या एक पाऊल पुढे जाऊन मंत्री चंद्रकांत पाटलांनी असे जाहीर केले की दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही.
हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला, असमानी संकटामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली.सरकार शेतकऱ्यांप्रति गंभीर नाही त्यामुळे उदासीन सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये व शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये सरकार बद्दल संतापाची लाट उसळली.
त्यानंतर सरकारने तातडीने एक निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत वर्षा बंगल्यावर दिखाव्यासाठी दिवाळी साजरी केली.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ लावण्याच्या सरकारच्या शेतकरी विरोधी या कृतीमुळे शेतकऱ्यांच्या पोरांनी दिनांक २७ ऑक्टोबर रोजी समाज माध्यमावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरून एक मोहीम चालविली ती म्हणजे *#आम्ही शेकऱ्यांसोबत #ओला दुष्काळ जाहीर करा.* त्या मोहिमेत अनेक विद्यार्थी आणि युवकांनी सहभागी होऊन वेगवेगळ्या घोषवाक्यांचा वापर करून सरकारचे लक्ष वेधले आहे. अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा, असमानी संकटाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण द्या, शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानपोटी भर भक्कम मदत करा, सोयाबीन,कापूस आणि कडधान्यांचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने आयात निर्यातीच्या आघाडीवर शेतकऱ्यांना जो फास लावलाय ते सुलतानी संकट दूर करा. या मोहिमेत नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी – युवक मोठ्या संख्येने सामील झाले होते.शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सीटू चे कामगार – कर्मचारी पाठींबा देत रस्त्यावर उतरले होते. ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणुन पुन्हा रस्त्यावरच्या लढाई साठी सज्ज आहेत.
कॉ.गंगाधर गायकवाड
जनरल सेक्रेटरी : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU) नांदेड जिल्हा कमिटी तथा राज्य कमिटी सदस्य. मो.7709217188.