KINWATTODAYSNEWS

महामार्गावरील स्ट्राईक फोर्सच्या गस्तीवर असलेल्या पथकाने दुधगावाजवळ तीन सायकलीवरुन कटसाईज सागवान पकडले

किनवट/प्रतिनिधी— महामार्गावरील स्ट्राईक फोर्सच्या गस्तीवर असलेल्या पथकाने दुधगावाजवळ तीन सायकलीवरुन कटसाईज सागवान पकडले. ८ जून रोजीच्या पहाटे तीन वाजताचे दरम्यान चिखलीकडून किनवटकडे नेतांना पथकाने कार्यवाही केली. लाकूड तस्करांना सुगावा लागताच लाकडासह सायकली फेकून पसार झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
८ जून रोजी नांदेडचे प्रभारी उपवनसंरक्षक तथा किनवटचे सहायक वनसंरशक्षक एम.आर.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्राईक फोर्सची गस्त चालू असतांना पहाटे तीन वाजताचे दरम्यान चिखली ते किनवट या महामार्गावरील दुधगावाजवळ तीन सायकलीवर लाकूड तस्कर कटसाईज सागवान लाकूड घेऊन जात होते. पथक पाठलाग करीत असल्याचा सुगावा लागताच सायकलीसह लाकूड फेकून तस्करांनी पोबारा केला. सदरचा मुद्देमाल पथकाने जप्त केला असून वनगुन्ह्याची नोंद केल्याचे सुत्रांनी सांगितले.
फोर्सचे वनपरिक्षेत्र अधिकाली हराळ यांच्या पथकातील ईस्लापूरचे वनपाल एस.डी.हाराळ, वनपाल के.एम.बर्लेवाड, चिखलीचे वनरक्षक एस.एम. वैद्य, वनमजूर शेख ख्वाजा व दिगांबर दुरपुडे यांनी ही कार्यवाही केली हे विशेष. परंतु कोठारी वनतपासणी नाक्यावरुन खुल्लेआम रात्रंदिवस तस्करी मार्गाने लाकूड वाहतूक केली जाते या संबंधाने त्या कर्मचा-यांवर कधीच कार्यवाही केलेली नाही. हा नाका मेंढ्या-बक-या घेऊन जाणा-या ट्रकचा वसुली नाका ठरला आहे.

243 Views
बातमी शेअर करा