*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.23.हिमायतनगर तालुक्या मधील मौ. सिरंजनी येथे महर्षी वाल्मीकी जयंती कोळी राष्ट्रसंघ नांदेड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जंगेवाड भाऊ यांच्या हस्ते
वाल्मीकी ऋषी प्रतिमेच पुजन करुन झेंडावंदन करण्यात आली.
सदर,दरवर्षीप्रमाणेच सिरंजनी येथे मोठ्या उत्साहात महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या प्रतिमेची मिरवणूक,महाप्रसाद भाषणे अदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतो.
यावेळी,अध्यक्ष लक्ष्मणदादा जंगेवाड यांनी समाज बांधवाना संबोधीत करताना म्हणाले की “महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी लिहिलेल्या रामायण कथेचा आदर्श आपल्या समाजातील प्रत्येक कुटुंबांनी घेतला पाहिजे.
आदिवासी कोळी समाज बांधवांनी जात प्रमाणपत्र काढून हक्कांच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा फायदा समाज बांधवांनी घ्यावा.जात प्रमाणपत्र त्वरित काढून घ्यावे. आपल्या पाल्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन शासकिय सेवेत जाण्यास प्रेरित करावे.ज्याची गरीब परिस्तिथी आहे त्यांनी शिक्षणापासून वंचित राहु नये या उद्देशाने वह्या, पुस्तक,पेन,दप्तर फी भरणे अश्या अनेक प्रकारची पत्रकार कोळी राष्ट्रसंघ मराठवाडा उपाध्यक्ष मा.श्री.उद्धव भाऊ मामडे रावधानोरकर यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणजी नागरवाड,(सुकनुरकर) यांनी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र बाबद सविस्तर मार्गदर्शन विविध पुरावे देऊन जात प्रमाणपत्र काढून देऊ असेही ते म्हणाले,जयंतीचे आयोजन सिरंजनी येथील समस्त आदिवासी कोळी समाज बांधव, कोळी राष्ट्रसंघ संघटना टीम यांनी केले.
यावेळी,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मण जंगेवाड कोळी राष्ट्रसंघ नांदेड जिल्हाध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण नागरवाड,सुकनुरकर ता. मुखेड दै.हिंदुसम्राट वृत्तपत्राचे पत्रकार कोळी राष्ट्रसंघ मराठवाडा उपाध्यक्ष,उद्धवभाऊ मामडे रावधानोरकर,
हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महाजन साहेब,ज्ञानेश्वर जिंकलवाड महाराष्ट्र पोलीस जमादार राचेवार सर,श्रीकांत बोईनवाड कोळी महासंघ किनवत तालुका अध्यक्ष,राजू गुंडेवाड कोळी राष्ट्रसंघ हदगाव तालुका अध्यक्ष श्रीबालाजी करडेवाड हदगाव तालुका संघटक मारोती करडेवाड,को.रा.सदस्य गंगाधर मामीलवाड,रामेश्वर पिटलेवाड,पत्रकार बाबाराव जरगेवाड,पोलीस पाटील राऊत,आनेबोईनवाड, बमलवाड,पिटलेवाड,पालेवाड, भिमरवाड,मुद्दनवाड,कंदेवाड,भंडरवाड,बोईनवाड,घूमणवाड,मोतकुलवाड,सोमेवाड,भदेवाड,गूलेवाड,दिवटेवाड,राहुलवाड,चिंतलवाड,मुकेवाड यांच्यासह तालुक्यातील गावातील महिला भगिनी बालगोपाल,वयोवृद्ध समाज बांधव अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.