KINWATTODAYSNEWS

उमरी (बा.)रस्त्यावर 40 𝚖.𝚖 गिट्टी टाकल्यामुळे गावात जाणारे येणार वाहने स्लीप होताहेत.

उमरी (बाजार ) उमरी येथे सा.बा.विभागाच्या रोडवर ठेकेदारांमार्फत सिमेंट रस्ता होत आहे गावातुन जाणार्या रस्त्यावर 40 𝚖.𝚖 गिट्टी टाकल्यामुळे गावात जाणारे येणार वाहने स्लीप होत आहे.
किनवट तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याचे कामे सुरू असून सदरील कामे गुत्तेदाराने अर्धवट स्वरूपात ठेवले आहेत. रोडवर गिट्टी, दगड टाकून ठेवले असल्यामुळे अनेकांना रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे. अनेक वाहने या रस्त्यावरून स्लीप (घसरल्याने)अनेकांना मार लागलेला आहे.
याबाबत गावकरी संताप झाले असून सदरील रास्ता ताबडतोब दुरुस्त करावा अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा उमरी वासीयांनी दिला आहे.

111 Views
बातमी शेअर करा