KINWATTODAYSNEWS

महापालिकेत सिटू संलग्न कामगार कर्मचारी संघटनेची स्थापना

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मध्ये दिनांक १७ रोजी सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन अंतर्गत कामगार कर्मचारी संघटनेची स्थापना करण्यात आली.
कंत्राटी व कायम कामगारांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे निवेदन महापौर जयश्री पावडे आणि आयुक्त डॉ. सुनील लहाणे यांना सिटूच्या वतीने देण्यात आले.
महापौर पावडे यांच्या सोबत संघटनेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली असून संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड,सरचिटणीस कॉ. उज्वला पडलवार, कॉ.श्याम सरोदे,कॉ.कांताबाई भिसे, आदींचा समावेश होता. स्थानिक आशा आणि सफाई कामगार कर्मचारी यांच्या मागण्याचे दोन वेग वेगळी निवेदने देण्यात आली आहेत.
नूतन पदाधिकारी मंडळामध्ये दशरथ धोंगडे,कांताबाई भिसे, अरुणाबाई देवकते, रवींद्र वाघमारे, देवानंद भिसे,कमलबाई थोरात आदींना घेण्यात आले असून महापालिकेचे सफाई कामगार चांदोबा भिवा भिसे यांचे कर्तव्यावर असताना दि.१३ ऑक्टोबर २०२२ रोजी शहरातील महाराणा प्रताप पुतळा परिसरात निधन झाले असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोविड – १९ काळातील मृत्यू संदर्भाने पन्नास लाख रुपये मदत करावी, सर्व कामगारांचा पगार दिवाळी पूर्वी करण्यात यावा.सफाई कामगारांना विनाकारण त्रास देणाऱ्या ठेकेदार आणि त्यांच्या प्रतिनिधीना त्रास देऊ नये अशा सूचना कराव्यात.ठेकेदार व इतरांनी संगणमत करून कामगारांचा भविष्य निर्वाह निधी अद्याप देण्यात आला नाही यासंदर्भाने सखोल चौकशी करून योग्य कारवाई करावी आदी मागण्या युनियन च्या वतीने करण्यात आल्या आहेत.
कंत्राटी आणि कायम कामगार, सुरक्षा रक्षक आणि इतर महापालिका कर्मचाऱ्यांना काही अडचणी आल्यास संघटनेस सपंर्क साधावा सर्वतोपरी मदत केली जाईल असे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

49 Views
बातमी शेअर करा