किनवट/प्रतिनिधी:- ता.१५
एक स्थानक एक उत्पादक , कौशल विकास भारत अभियाना अंतर्गत किनवट रेल्वे स्थानकावर ‘एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट ‘ व गृहलक्ष्मी महिला ग्रामविकास संस्था किनवटच्या सहकार्याने मौजे मरकागुडा येथील आदिवासी युवक- युवतींना बचत गटांनी हातांनी तयार केलेल्या बांबुच्या शोभेच्या वस्तूचे किनवट रेल्वे स्थानक येथे मौजे मरकागुडा येथील आदीवासी युवक युवतींनी स्टॉल उभारले यावेळी या स्टॉलचे उद्घाटन करताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक मा.रुपेश जी दलाल व मा.स्टेशन मास्टर , मा.डॉ. सुनील व्यवहारे गृहलक्ष्मी महीला ग्राम विकास संस्थेच्या अध्यक्षा मा. संगिता पाटील, मा.आत्मानंद सत्यवंश सर, उमेदचे पं स. चे समन्वयक मा. आडे सर मरका गुडाचे सरपंच रमेश मडावी आदींची प्रमुख उपस्थिती होती या द्वारे युवक प्रेरीत होवून स्वावलंबी बनतील अशे विचार या वेळी एम.जी. बी.शाखेचे व्यवस्थापक रुपेश दलाल यांनी मांडले.
प्रधानमंत्री यांच्या कौशल विकास भारत ‘एक स्थानक एक उत्पादन’ योजने अंतर्गत आदीवासी युवक- युवतीसाठी स्वंयरोजगार
154 Views