श्रीक्षेत्र माहूर/ प्रतिनिधी
माहूर ग्रामीण रुग्णालयातील आयुष विभागाचे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ.निरंजन बाबाराव केशवे यांचेवर माहूर पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्याचा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने निषेध केला असून दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन दि.१० ऑक्टों.रोजी माहुर पोलिसांना दिले आहे.
अत्यंत संयमी,शांत व सुस्वभावाचे धनी असलेले डॉ.निरंजन केशवे यांनी कोविड काळात जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णांची केलेली सेवा रुग्णालय प्रशासनाने लक्षात घेऊन त्यांचेवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर प्रकारामुळे त्यांचेसह ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन झाली असून मानसिक खच्चीकरण सुद्धा झाले असल्याचे त्यात म्हटले आहे.निवेदनावर वैद्यकीय अधीक्षक डॉ.विद्या झिणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.किरणकुमार वाघमारे, डॉ. ए. डी.आंबेकर, डॉ.कुलसुम फातेमा, डॉ.सय्यद वसीम,डॉ. व्ही. टी.साठे, डॉ. एस. डी. साळुंके, एस. सी.बोथिंगे,एल.जी.मेंडके, एम. एस. कनाके, सी. एच. मुदाळे, आर.एच. बिलावेकर, डी. एन. पालटकर, एस. पी. गेडाम, पी. आर. जुडे, ए. आर. कऱ्हाळे, टी. एम.शेंडे,जी. आर.भोपाळे, आर. डी.केंद्रे, व्ही. पी. मुंडे,के. आर. आयटवार, एच. के.कुमरे,जी.डी. काळे, डी. डी. मुळे, एस. वाय. कावळे, पी.जी .धोंगडे, टी.एन.पाटील,रंजना कांबळे, एस.ओ.मुनगीनवार, के. बी. नोमुलवार,पी. आर. कच्चलवाड, डी. डी.शेंडे व पी. व्ही. खरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.*डॉ.निरंजन केशवे यांनी कोविड काळात केलेले उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊनच वरील मागणी करण्यात आली. त्यासाठी कुठलाही दबाव येण्याचा प्रश्नच नाही. टाकलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडणार,अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्याने काहींचे षडयंत्र सुरू असल्या बाबत आपल्याला कल्पना नसल्याचे.*वैद्यकीय अधीक्षक डॉ.विद्या झिणे यांनी सांगितले.
डॉ.निरंजन केशवे यांचेवर दाखल गुन्ह्याचा रुग्णालय प्रशासनाने केला निषेध.
1,123 Views