*विशेष जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*उदगीर*:दि.8.श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात वायुसेना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विचारमंचावर विद्यालयाचे कमांडंट कमांडर बी के सिंह, प्राचार्य वसंत कुलकर्णी, गणित विषयाचे विभाग प्रमुख संतोष चामले, योगगुरु रामचंद्र गरड, प्रल्हाद येवरीकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमांडंट कमांडर बी के सिंह आपल्या मार्गदर्शनात म्हणाले,भारतीय संरक्षण दलाच्या पाच मुख्य विभागांपैकी एक वायुसेना विभाग आहे.
भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतीय हवाई युद्ध करण्याची जबाबदारी वायुसेनेच्या सैनिकांची आहे.भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य,*नभ:स्पृश्य दीप्तम*’ असे आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी वायुसेनेत जाऊन देशाची सेवा करावी. अत्याधुनिक लढाऊ विमानांची भर पडल्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च चार नंबरची वायुदल आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे योगगुरु रामचंद्र गरड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, ०८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो.भारतीय वायुसैनिकांनी भारत पाक युद्धात आपला सहभाग नोंदवला व आपले श्रेष्ठत्व सिद्ध करुन दाखवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार प्रल्हाद येवरीकर यांनी मानले.
यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, उमाकांत नादरगे,विनायक करेवाड,सर्व हाऊस मास्टर यांनी परिश्रम घेतले.