*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.6.राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी ठाकरे सरकारच्या काळात भोकर मतदारसंघातील मुदखेड,अर्धापुर आणि भोकर या तीन तालुक्यातील १८३ गावांना पुढील ३०-४० वर्षातील वाढती लोकसंख्या लक्षात धरून पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी शाश्वत स्त्रोत असलेली वॉटर ग्रीड योजना आणण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी संबंधितांना सूचना केल्या.इतका दूरदृष्टीचा विचार करून सर्वच १८३ गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न एका झटक्यात व कायमस्वरूपी सुटण्यासाठी साहेबांनी जी योजना आणली ती वाखानण्याजोगी आहे.साहेबांचे त्यासाठी करावे तितके कौतुक कमीच! श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेबांनी शिवारात पाणी आणले आणि आता घराघरात पाणी येणार आहे.
मध्यंतरीच्या काळात या योजनेचा ठाकरे सरकारकडे प्रस्ताव आला परंतु मधल्या काळात सरकार कोसळले.मा.अशोकराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीतील योजना जी मानवीय दृष्टीकोनाची आणि लोकहिताची असल्याने नव्या सरकारनेही यास तातडीने मंजुरी देत ७२८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता आपल्या सर्वांना घरोघरी कायमस्वरूपी इसापूर (UPP) धरणाचे पाणी मिळणार आहे.
त्यामुळे आपल्या सारख्या सर्वच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
वॉटर ग्रीड योजना आणून आपला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चव्हाण साहेबानी कायमस्वरूपी सोडविल्या बद्दल आपल्या सर्वांनीच म्हणजे १८३ गावच्या नागरिकांनी एकत्रित येत साहेबांचा नागरी सत्कार करायला हवा. कारण पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवनात इतर गोष्टी गौण आहेत.
आता सर्वाना केंद्र व राज्य सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत इसापूर धरणातून स्वच्छ व फिल्टर युक्त पाणी मिळणार आहे.त्याबद्दल आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे भोकर वासियांन तर्फे आभार वेक्त केले जात आहेत.