किनवट ता.प्र दि ६ तेलगु भाषीक महिलांचा आवडता सण म्हणजे बदकम्मा हा सण आज किनवट शहरात पारंपारीक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी गेल्या अनेक वर्षाची परंपरा जोपासत कै. गोविंदराव तिरमनवार यांच्या वेलमापुरा येथिल घरा समोरुन तेलगु भाषीक महिलांच्या मोठ्या समुहाने बदकम्मा सणा निमित्त सुंदर फुलांनी सजवलेल्या फुलांची आरस तयार केली तर या दहा दिवसाच्या पुजापाठ व उत्सवा नंतर आज या बदकम्माचे विसर्जन मोठ्या उत्साहत भव्य मिरवणुकीव्दारे केले जाते.
शहरातील तेलग़ू भाषीक महिला या कै. गोविंदराव तिरमनवार यांच्या घरासमोर एकत्र येऊन बदकम्मा सणा निमित्त मोठी मिरवणुक काढतात या मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. ती परंपरा कै.गोविंदराव तिरमनवार यांच्या दुस-या व तिस-या पिढीतील सुना व नातसुना जोपासत असल्याने त्यांचे शहरातील तेलगु भाषीक महिलांसोबत एक दॄढ ऋणानुंबध याव्दारे जोडले गेले आहे.
यावेळी रमना अनिल तिरमनवार, नंदा तिरमनावार, विना कॄष्णा नेम्मानिवार, संतोषी मुकुंद नेम्मानिवार, सुहसिनि श्रीनिवास नेम्मानिवार याच्यासह असंख्य महिला बदकम्मा सणामध्ये मोठ्या उत्साहात शामिल झाल्या होत्या तरी बद्कम्मा मिरवणुकी दरम्यान मुसळधार पाऊस पडुन हि महिलांचा उत्साह कमी झाला नव्हता.
तेलगु भाषीक महिलांचा आवडता सण म्हणजे बदकम्मा हा सण आज किनवट शहरात पारंपारीक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा
102 Views