KINWATTODAYSNEWS

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संजय राजुळे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित* *राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उमेश खोसे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

लातूर : आजच्या धावपळीच्या युगात अनेक जण विविध सेवा देत असतात. हे सर्व चालू असतांना प्रत्येकाला इतरांकडे लक्ष देण्यास वेळ नाही परंतू लातूरातील साहित्य सारथीने सामाजिक कार्य करणार्‍या मान्यवरांचा शोध घेवून त्यांचा यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हा संघटक संजय राजुळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन समाजसेवेचा कोरोणा योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संजय राजुळे यांनी कोरोना काळात केलेले कार्य स्तुत्य असेच आहे. याची दखल घेऊन साहित्य सारथी कला मंचाच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले.
लातूरातील मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिध्द लेखक व इतिहास संशोधक योगेश पाटील (पुणे) व अध्यक्षस्थानी सरस्वती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवराज पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथी लेखक, इतिहासकार विवेक सौताडेकर, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, जिजाऊ ब्रिगेडचे सचिव सौ.समाधानताई माने, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे लातूर तालुकाध्यक्ष कमलाकर सुर्यवंशी, औसा तालुकाध्यक्ष मंचक रंडाळे, साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रविकिरण सुर्यवंशी, सचिव दत्तात्रय परळकर, संतोष सोनवणे, राम रोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात संजय राजुळे यांनी कोरोना काळाच्या भयावह परिस्थितीत सर्वांना धीर देण्याचे काम केले. त्यांनी लोकांमध्ये जावून कोरोनाविषयीची जनजागृती करून कोरोना रोगाला न घाबरता सर्व काळजी घेवून कोरोनाशी दोन हात करण्याचा सल्ला दिला. नंतर पुढे कोरोनाची लस भारत सरकारकडून उपलब्ध झाली. परंतू लोक हे लस घेण्यास पुढे येत नव्हते तशाही परिस्थितीत त्यांनी प्रथम स्वतः लसीकरण करून घेवून लोकात जावून मी लसीकरण केले आपणही लसीकरण करा असा संदेश दिला. या लसीमुळे कुठलीही आपल्या शरीराला हानी होणार नाही अशी जनजागृती त्यांनी केली. कोरोनाच्या महाभयंकर दुसर्‍या लाटेत संजय राजुळे यांनी अनेकांना दवाखान्यात बेड मिळत नसतांना बेड उपलब्ध करून दिले. कुठे दवाखान्याचे काम आडत असेल तर त्याठिकाणी जावून डॉक्टरांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रेमडीसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने कोरोनाच्या काळात रूग्णांच्या नातेवाईकात तीव्र असंतोष होता अशा प्रसंगी त्या नातेवाईकांना भेटून त्यांना धीर देण्याचे काम संजय राजुळे यांनी केले. कोरोना काळात जे-जे लोक चांगल्या प्रकारे काम करत होते अशा व्यक्तींचा शोध घेवून संजय राजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमतः कोरोना योध्दा पुरस्कार देवून गौरविण्यात आले व त्यांना कोरोनाच्या लढाईत लढण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम संजय राजुळे यांनी केले त्यामुळेच आज लोकांमध्ये कोरोनाबद्दलची जनजागृती दिसून येत आहे.
याच त्यांच्या कार्याची दखल घेवून साहित्य सारथी कला मंचाच्या वतीने संजय राजुळे यांना कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी सुरेश धोत्रे तर आभार संस्थेचे अध्यक्ष गंगाधर डिगोळे यांनी मानले. याकार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश परळे यांनी केले. कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सर्व राज्य पदाधिकारी, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख रियाज शेख, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संतोष सोनवणे, सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी व सदस्यांनी संजय राजूळे यांचे अभिनंदन केले आहे.

48 Views
बातमी शेअर करा