किनवट/प्रतिनिधी: नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन किनवट जिल्हा आणि मांडवी व बोधडी ही गावे तालुका निर्माण करण्याबाबतचे निवेदन माननीय राधाकृष्ण विखे पाटील( महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य संध्याताई प्रफुल्ल राठोड यांनी दिले आहे.
महाराष्ट्रातील नांदेड हा जिल्हा औद्योगिक दृष्ट्या अतिशय मागासलेला आहे व विस्ताराने मोठा जिल्हा आहे या जिल्ह्यात एकूण 16 तालुके आहेत तर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून किनवट व माहूर हे तालुके 150 ते 175 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य जनतेला जिल्हा मुख्यालय जाऊन विकास कामे करणे अवघड होत आहे. तसेच नरेंद्र मोदी साहेब यांच्या “सबका साथ,सबका विकास” या धोरणानुसार आदिवासी व बहुल परिसरातील जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने विकास निधीची गंगा आणण्यासाठी तसेच या परिसरातील सर्वसाधारण जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन किनवट जिल्हा मांडवी व बोधडी तालुका निर्माण करण्याची गरज आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
किनवट जिल्हा आणि मांडवी व बोधडी तालुका निर्माण करण्याबाबतचे निवेदन मा. राधाकृष्ण विखे पाटील( महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना संध्याताई राठोड यांनी दिले निवेदन.
199 Views