KINWATTODAYSNEWS

दिग्रस तालुक्यातील लाख(रायाजी) गावातील रस्त्यावर लाखो खड्डे

दिग्रस तालुक्यातील लाख(रायाजी)गावातील मुख्य रस्त्यावर लाखो खड्डे असल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते लाख(रायाजी) गावापासून ते लाख फाट्यापर्यंत दोन किलोमीटरच्या अंतरावर दोन लाख खड्ड्या पेक्षा जास्त खड्डे आपल्याला पाहायला मिळते असे प्रत्यक्षदर्शी पाहण्यास येत आहे.
सुमारे साडेचार ते पाच हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे. गावात बाजारपेठ नसल्याने गावातील लोक तालुक्याच्या ठिकाणी जात असतात, या रस्त्यावर छोटे मोठे अपघात हे रोजच होत आहे. गावात मोठे रुग्णालय नसल्याने उपचारासाठी गावातील नागरिक तालुक्याच्या ठिकाणी दिग्रस येथे जातात रुग्णांना/ किंवा प्रसूती दरम्यान एखाद्या महिलेला नेतांनी रस्त्यातच प्रसूती झाली. अशा घटना नगण्य आहे. अनेकदा अनेकांच्या कमरेला झटका लागल्याने मणक्याचे त्रास सुद्धा झाले आहे. गावातील एकही कर्मचारी मुख्यालयीन राहत नाही रोज येणे जाणे करतात त्यामुळे त्यांनाही रोज वेळेवर येणे शक्य नाही.व येणे जाने करतांना त्यांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते व परंतु गावाचा दोन किलोमीटर अंतराचा मुख्य रस्ता हा अतिशय झरझर झाल्याने या रस्त्यावरून चालताना किंवा वाहन नेतांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याचे वारंवार शासन दरबारी निवेदन देऊनही कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही प्रसार माध्यमाच्या मदतीने अनेक बातम्या प्रकाशित करूनही कोणत्याच प्रकारची दखल घेतल्या गेली नाही व कोणत्याही आमदार खासदारांचे लाख गावाकडे लक्ष नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी ठरवलं की या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी आमरण उपोषण व आर्णी-दिग्रस मुख्य रस्ता रोको करून व गावातच भिक मागो आंदोलन करायचे व भिक मागितलेले पैसे शासनाला देऊन त्या पैशातून रस्ता बनवण्याची मागणी करायची असे गावकऱ्यांनी ठरविले आहे.

67 Views
बातमी शेअर करा