KINWATTODAYSNEWS

एक्स्पायरी औषधी देऊन रुग्णांला धोक्यात टाकणाऱ्या रुग्णालय व मेडिकल स्टोअरवर कार्यवाही करा .जिल्ह्यातील सर्वच सरकारी रुग्णालयाचे सारखेच हाल

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.15.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत चालणाऱ्या श्रावस्तीनगर नांदेड येथील दवाखान्यातील औषधीची तपासणी करून संबंधीत दोषींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी १२ सप्टेंबर २०२२ रोजी एका निवेदनाद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. कारण एक्स्पायरी औषधी देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळ चालविला आहे.एक्सपायरी झालेले औषध खावून रुग्णाला काही झाल्यास याची जबाबदारी मनपा घेणार आहे का ? असा सवाल निवेदनातून तक्रारकर्त्यानी उपस्थित केला आहे.

या निवेदनात म्हंटले आहे कि, आपल्या मनपा हद्दीत असलेल्या आयुष्यमान भारत अंतर्गत चालणाऱ्या श्रावस्तीनगर येथील दवाखान्यात दिनांक १० सप्टेंबर रोजी तुळसाबाई परसराम शिंदे (वय ७५ वर्षे) या तपासणीसाठी गेल्या असता त्यांना तेथील उपलब्ध मेडीकल मधून मेडीसीन देण्यात आले. त्यातील एक औषध हे मे २०२२ लाच एक्सपायर झालेले आहे.

त्या औषधीला एक्सपायर होऊन जवळपास ५ महिणे झाले आहे. तरीही ते औषध वरील रुग्णाला देण्यात आले.दोन दिवसानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना औषध एक्सपायर असल्याचे निदर्शनास आले.तो पर्यंत त्या रुग्णाने त्या औषधीचे चार डोस घेतलेले होते. त्यामुळे दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजी रुग्णाचे नातेवाईक संबंधीत दवाखान्यात डॉक्टर व मेडीकलला भेट देण्यासाठी गेले. परंतु संबंधितांनी समाधानकारक उत्तर न देता त्या रुग्णाच्या नातेवाईकाला तुम्ही तुमच्याकडील घरचे जुने औषध घेऊन आलात हे औषध आम्ही दिले नाही.तुमचा पेशंट आमच्या दवाखान्यात आला नाही. असे सांगून बाहेर काढण्यात आले.

दिनांक १० सप्टेबर २०२२ रोजी वरील रुग्ण त्या दवाखान्यात गेल्याची नोंद तेथील उपलब्ध रजिस्टर मध्ये आहे.

याबाबत अजुन विचारपुस केली असून, दवाखान्यातील मेडीकल वरचे फार्मासिस्ट सहा महिण्यापासून सुट्टीवर असल्याचे कळाले.वरील सर्व प्रकरण पाहता डॉक्टर व मेडीकल मधील फर्मासिस्ट यांना रुग्णाची काळजी असल्याचे दिसून येत नाही.

एक्सपायरी झालेले औषध खावून रुग्णाला काही झाल्यास याची जबाबदारी मनपा घेणार आहे का ? असा सवाल करीत रुग्णाच्या नातेवाईकाने एक्सपायर औषध देऊन रुग्णाच्या जीवनाशी खेळ चालविणाऱ्या डॉक्टर व मेडिकल फार्मासिस्टची लवकरात लवकर चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी असेही दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. तसेच देण्यात आलेले औषधीचे नाव IRON AND FOLIC ACID SYRUP I.P. BATCH NO 0211 MFG DATE 12 /2020 EXP DATE 05 /2022 असल्याचे तक्रारकर्ते मारोती गोविंदराव कल्याणकर रा.श्रावस्तीनगर नांदेड यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

या निवेदनाच्या प्रति त्यांनी मा.ना.गिरीषभाऊ महाजन, आरोग्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, मा.जिल्हाधिकारि साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड, मा.औषधी निरीक्षक,नांदेड याना पाठविले आहेत.

57 Views
बातमी शेअर करा