KINWATTODAYSNEWS

*धान्य गोडाऊनच्या जागेवर* *अण्णाभाऊ साठे यांच्या नावे* *आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक साहित्य दालन उभारा-बापूराव गजभारे*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.14.व्हीआयपी रस्त्यावर असलेल्या जुन्या धान्य गोडाऊनच्या जागेवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय साहित्य दालन आणि सांस्कृतिक सभागृह उभे करण्यात यावे,व उर्वरित जागेत वाणिज्य कॉम्प्लेक्स बांधावे अशी मागणी पीआरपीचे राज्य महासचिव नगरसेवक बापूराव गजभारे यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुरवणी विषय पत्रिकेवरील क्रमांक 2 वर व्यापारी संकुल बीओटी तत्वावर राबविण्याची मान्यता मिळणे बाबत ठेवलेल्या विषयावर बोलतांना केली.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी आम्ही मनपाला तसा प्रस्ताव दिल्याची आठवण करून दिली
मनपाने दि.19.07.2014 रोजी ठराव क्रमांक 33 च्या आधारे महसूल विभागाची धान्य गोडाऊनची 4363.86 इतकी जागा वापरात नसल्यामुळे ती अण्णाभाऊ साठे संकुल उभारण्यासाठी देण्याची मागणी केली होती.दि 08.08.2014 प्रस्ताव मंजूर होऊन जमीन हस्तांतरण करण्यात आली.
खोब्रागडे नगरला लागून असलेली हि जागा
महाराष्ट्र गल्लीच्छ वस्ती सुधारणा अधिनियम 1971 च्या
तरतुदी अन्वये घोषित असल्याने मालमत्तेचा विनियोग कलम 79.चे 2 {ग } सार्वजनिक प्रयोजनासाठी प्रथम प्राधान्याने येथील नागरिकांचा विचार करावा लागतो असा नियम आहे.

त्यानुसार मनपाने निर्णय घ्यावा कोणत्याही सबबीवर हि जागा बीओटीला देऊ नये
मनपाकडे तज्ञ् अभियंते असल्यामुळे ती जागा स्वतः विकसित करावी अशी भूमिका मांडली.खोब्रागडेनगर,मध्ये जाण्यासाठी लहान रस्ता असल्यामुळे तो रुंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

108 Views
बातमी शेअर करा