KINWATTODAYSNEWS

घोटी गावाचा सर्वांगीण विकास करन्यासाठी संवेदनशील तथा युवावर्ग उतरला ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

किनवट (तालुका प्रतिनिधी) शहरा जवळून जवळच असलेल्या घोटी येथील ग्रामपंचायतीचे समीकरणे यावर्षी बदलणारे चित्र सध्या तरी स्पष्ट दिसून येत आहे. कारण नवनवीन तरुण यावर्षी निवडणूक रिंगणात उतरले असून जनता नवीन चेरह्यांना संधी देणार का जुन्या, हा विषय औत्सुक्याचा आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले तरीही घोटी गाव विकासाच्या बाबतीत अतीशय मागे आहे. आजही घोटी येथे ग्रामपंचायतीची जुनी ईमारत आहे.स्वतंत्रकामकाजासाठी इमारत नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे. विकासाच्या बाबतीत फक्त जनतेला भुरळ घालण्याचे कामे पार पाडले आहेत. सांडपाणी, दिवाबत्ती, रस्ते, नाली, याबाबतीत हे गाव अती मागासले असून आजही रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. अनेक वर्षा पासून विकासाच्या नावाखाली आपले खिसे जड करण्याचा गोरखधंदा सुरू असुन विकास कामे मात्र नावालाच अशी परिस्थिती असताना देखील काहींना ग्रामपंचायतीची खुर्ची सोडावासी वाटत नाही. काय दडलंय यात ? आगामी निवडणुकीत काही तरुण युवकांनी उडी घेतली आहे. सध्या जनतेचा कौल विकास कामाकडे असून आगामी निवडणुकीत उमेदवार हा सुशिक्षित, विकासाबाबत तळमळ असणारा, गावात उद्भवत असलेल्या प्राथमिक गरजा सोडविण्यासाठी सदैव तत्पर असावेत, एकंदरीत उमेदवार हा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला असावा असे जनतेतून ऐकावयास मिळत आहे. आजपर्यंत केल्याचे दिसून येत आहे फक्त जनतेला खोटी आश्वासन देऊन काम चालविले आहे. परंतु यावेळी जनताच निवडणार आपल्या पसंतीचा सरपंच, कारण सरपंच पद हे थेट जनतेतून असल्याने फक्त वार्डापुरता मर्यादीत नसून संपूर्ण गावातील जनतेची पसंती महत्वाची आहे. यासाठी उमेदवार हा निःपक्षपाती समाजात एकता प्रस्थापित करणारा असावा, ना की तेड, सध्या तरी रिंगणात उतरलेले धुरंदर विकास कामांवर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे. असे कित्येक वर्षे लोटून गेली आहेत. जनतेला विकासाचे आश्वासन द्यायचे आणि विसरून जायचे ही एक परंपराच बनत चालली आहे. हे कुठे तरी थांबवायला पाहिजे, अन्यथा विकास कामांच्या नावाने फक्त खोटीच आश्वासने देण्याचे सुरूच राहणार? अनेक वर्षापासून समस्यांचे माहेरघर व पेसाअंतर्गत असलेले घोटी हे गाव विकासापासून कोसोदूर वर्षापासून विकास कामांचे तीनतेरा वाजले आहेत. परंतु यावेळी जनता नव्या व विकासाभिमुख चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा सध्या चौका-चौकात, वार्डात होत असल्याचे दिसून येत आहे. नेहमी एकच एक चेहऱ्याला जनता वैतागली असून यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसून येत आहेत. यावेळी जनतेचे ब्रिद ‘नवा चेहरा विकासाचा मोहरा’ असून घोटी ग्रामपंचायतीला विकासाभिमुख चेहरा देण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केलेला दिसून येत आहे…
विलास संभाजी सुर्यवंशी
मो. न.9922910080.

101 Views
बातमी शेअर करा