KINWATTODAYSNEWS

बळीराम पाटील महाविद्यालयात आधार कार्ड ला मतदान लिंक एक दिवसीय शिबीर संपन्न

किनवट :प्रतिनिधी:
बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकशाहीला बळकट व मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय मतदान जागृती अभियान अंतर्गत तहसील कार्यालय किनवट व राष्ट्रीय सेवा योजना बळीराम पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने *आधार कार्ड ला मतदान कार्ड लिंक अभियान एक दिवसीय जागृती शिबीराचे* आयोजन करण्यात आले आहे. प्रसंगी संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ योगेश सोमवंशी बोलतांना म्हणाले राष्ट्राच्या विकासासाठी व लोकशाही बळकट करण्यास एक नागरीक एक मतदान आवश्यक आहे. आसे ते म्हणाले.
हा कार्यक्रमक किनवट शिक्षण संस्था किनवट चे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड व तहसिल कार्यालय किनवटच्या डॉ. मृणाल जाधव यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. बँबरेकर होते. तर प्रमुख उपस्थितीत नायब तहसिलदार मोहम्मद रफिक मोहम्मद बसिरोद्दिन
निवडणूक विभाग सहसिल कार्यालय किनवट तसेच मनोज कांबळे तांत्रिक साहयक निवडणूक विभाग तहसिल कार्यालय किनवट, उपप्राचार्य डॉ. जी. एस वानखेडे, पर्यवेक्षक प्रा अनिल पाटील, मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रसंगी संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगेश सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांना आधारला मतदान कार्ड लिंक करण्यासाठी अँपची माहिती सांगूण त्यामध्ये मतदान कार्ड कसे अँड करण्याची सविस्तर माहिती सांगीतली त्यानंतर विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे निराकरण तांत्रिक सहाय्यक मनोज कांबळे यांनी केले. तसेच नायब तहसीलदार मोहम्मद रफिक मोहम्मद बसिरोद्दिन यांनी अँपचे महत्व व नवमतदार, नोंदनी विषयी सविस्तर माहीती सांगीतली. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.एस के. बेंबरेकर यांनी केला. विद्यार्थ्यांनी आपल्या गावा-गावात जावून जागृती करावी आसे अव्हाण केले.

कार्यक्रमाला मराठी विभागाचे प्रा.देवानंद वाघमारे, प्रा. सतिष मिराशे, रासेया कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषराव माने, प्रा. पुरुषोत्तम यरडलावार, महिला कार्यक्रम आधिकारी सुलोचना जाधव, निखिल खाराटे,गणेश धोतरे, रवि हट्टे, मनोज कुमरे, इस्माईल खिच्ची, प्रणाली गलपुलवार, नेहा चौधरी, साक्षी, आडे, हिना खाँन यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. शेषराव माने यांनी केले. तर उपस्थितीचे आभार प्रा. पुरुषोत्तम यरडलावार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

95 Views
बातमी शेअर करा