KINWATTODAYSNEWS

हुजपा विद्यालय कनकी येथे शिक्षक दिन साजरा

किनवट/प्रतिनिधी:
कनकी ता.किनवट येथील हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय वतीने 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 5 सप्टेंबर शिक्षक दिन हा संपूर्ण शिक्षकांच्या प्रति मान सन्मान व आदरभाव प्रकट करण्यासाठी चा शिष्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थी व शिक्षकांनी प्रकाश टाकला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या शिष्यांना सांगितले होते की माझा जन्म दिवस नुसता वाढदिवस म्हणून साजरा न होता तो शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा. पुढे त्यांच्या शिष्यांनी 1962 साली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस पहिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला. तेव्हां पासून आपल्या देशामध्ये आपण तो दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो. म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांनी केलेल्या कार्यकर्तूत्वाचा गौरव या दिवशी केला जातो. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते. अशा प्रकारे त्यांच्या संपूर्ण कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या वतीने 1954 साली त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

90 Views
बातमी शेअर करा