किनवट: दि.5/9/2022 रोजी बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले, याप्रसंगी डॉ. वसंत बामणे यांनी मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व याविषयी माहिती दिली, तसेच शिक्षणतज्ञ माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जिवन कार्य याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.किनवट संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्लरावजी राठोड, प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. प्रास्ताविक डॉ. आनंद भालेराव संयोजक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांनी केले व महाविद्यालया बद्दल माहिती दिली,याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना स्पर्धा परीक्षा संबधीत पुस्तके वितरित करण्यात आले,समारोप मार्गदर्शन उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे यांनी केले, संचलन प्रा. संतोष पवार सहसंयोजक यांनी केले तर आभार प्रा. सुलोचना जाधव सहसंयोजक स्पर्धा परीक्षा यांनी मानले, यशस्वीतेसाठी प्रा. दयानंद वाघमारे, प्रा. सतिश मिरासे व शुभम गाजलवार परिश्रम घेतले,कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना प्रतिज्ञा देवून सांगता झाली.
बळीराम पाटीलब.पा.महाविद्यालय किनवट येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन शिबीर सम्पन्न
100 Views