मुंबई: सामाजिक दायित्व हे प्रत्येक युवकाचे काम आहे त्याच अनुषंगाने ही जाणीवपूर्वक नियुक्ती देण्यात आली आहे . महेश गवई यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन व समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात सदैव पुढे करण्याचा ही असलेली त्यांची भूमिका या सर्व सामाजिक बाबींमुळे जितेंद्र आव्हाड युवामंचचे प्रदेशअध्यक्ष यांनी महेश गवई यांची जितेंद्र आव्हाड युवामंचच्या महाराष्ट्र संघटक पदी नियुक्ती केली आहे .
यावेळी महेश गवई यांनी बोलतांना सांगितले की , मी सदैव सामाजिक सेवेत सदैव तत्पर राहून गोरगरीबांना या जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या माध्यमातून सदैव मदत करेल अशी ग्वाही महेश गवई यांनी जितेंद्र आव्हाड साहेब यांना दिली . मा.कॅबिनेट गृहनिर्माण मंत्री आमदार .जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद सरोदे यांच्या नेतृत्वाखाली महेश गवई यांची जितेंद्र आव्हाड युवामंचच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड करण्यात आली आहे . तसेच मा . जितेंद्र आव्हाड यांनी महेश गवई यांना पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्यात .
*महेश गवई यांची जितेंद्र आव्हाड युवामंचच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड .
129 Views