प्रतिनिधी/ जलधारा/ किनवट :-
शासकीय आश्रम शाळा जलधारा येथे राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा करण्यात आला क्रीडा साहित्याची पूजा करून , मेजर ध्यानचंद यांच्या जीवन व कार्य त्याबद्दल माहिती देण्यात आली.
सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी मा. किर्ती किरण एच. पुजार यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्याध्यापक पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली विविध स्पर्धा आयोजन करण्यात आल्या कबड्डी कुस्ती कराटे बॉक्सिंग खो-खो त्या प्रसंगी श्री भवरे सर व जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना खेळ व खेळाचे महत्व यांचे मार्गदर्शन केले.
विविध डावपेचांची माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप प्रल्हाद येशीमोड यांनी दिली . कार्यक्रमास उपस्थित शिक्षक पाटील मॅम खोकले सर मेश्राम सर आडे सर हनुमाने सर केंद्रे सर मेटकर सर अधिक्षक सुर्यवंशी , गवले सर लिपीक , सय्यद व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.
शासकीय आश्रम शाळेत राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा
160 Views