*राष्ट्रवादी काँग्रेसचे सात संचालक तर काँग्रेसचे सहा संचालक बिनविरोध*
माहूर/प्रतिनिधी: तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था माहूर च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी सी. एस. मगर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात घेण्यात आली यावेळी अध्यक्षपदी मेघराज जाधव तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय शेरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तालुक्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या रेणुका कृषक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत 13 संचालक बिनविरोध निवडून आले होते आज दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक संस्थेच्या सभागृहात पार पडली त्यावेळी अध्यक्षपदासाठी मेघराज जाधव व उपाध्यक्ष पदासाठी दत्तात्रय शेरेकर यांचे नाव सुचविण्यात आले दुसऱ्या कोणाचाही अर्ज नसल्यामुळे या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित संचालक तुळशीराम दामा राठोड , भारत किसनराव बेहेरे, रावजी नथुजि राठोड, मनोज कीर्तने, गणेश जाधव, उद्धव पाटील जगताप, राजू सौंदलकर, मो. उस्मान मो.युसुफ,शे,तुराबअली शेख रहीम ,सौ. नम्रता मनोज कीर्तने सौ. पंचफुलाबाई गोविंदराव मगरे यांची उपस्थिती होती. निवड प्रक्रियेसाठी बामणे साहेब, सचिव रत्नपाल मोतेराव, दत्ता तळणकर ,श्याम उबाळे ,संतोष चव्हाण ,यांनी सहकार्य केले. अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडीबद्दल माजी आ. प्रदीप नाईक ,पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवरावजी केशवे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष समाधान जाधव ,काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय राठोड ,नगराध्यक्ष फिरोज दोसानी आणि माजी नगराध्यक्ष प्रा .राजेंद्र केशवे ,भटक्या विमुक्त जाती जिल्हाअध्यक्ष किसन राठोड, दत्तराव मोहिते,अनंतराव केशवे, मंचकराव देशमुख ,दिलीप मुनगिनवार, विश्वनाथ कदम ,डाॅ.निरंजन केशवे, आनंद तुपदाळे, संजय गायकवाड , बंडू पाटीलभुसारे , विनोद राठोड,रेहमत अली, विजय पाटील गावंडे ,राजकुमार भोपी,प्रा,भगवानराव जोगदंड पाटील , अमोल केशवे,विलास भंडारे, सचिन बेहेरे,जयकूमार आडकिने,आकाश कांबळे,राजकिरन देशमुख, निसार भाई,विक्रम राठोड,खाजाभाई,सलीम खाकरा,दिपक मूरादे,अझिम भाई,जीवन राठोड ,शे. लूकमान, आनंद राव कलाने, अमोल कदम, अरविंद राठोड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.
रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी माहूर अध्यक्षपदी मेघराज जाधव तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय शेरेकर यांची बिनविरोध निवड
189 Views