KINWATTODAYSNEWS

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त व्याख्यान व प्रा. रामकिसन सन्मुखराव लिखित “असं हे सगळं” आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न.

लातूर/प्रतिनिधी: क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ व लातूर शक्ती सेना लातूरच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती उत्सव निमित्त व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्राध्यापक रामकिसन संमुखराव लिखित “असं हे सगळं” या आत्मचरित्र पर पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 27 ऑगस्ट रोजी भालचंद्र ब्लड बँक गांधी मार्केट लातूर येथे आयोजन करण्यात आले होते.

या समारंभाचे अध्यक्षस्थानी लसकमा चे माजी अध्यक्ष डॉक्टर माधव गादेकर हे होते. सरस्वती महाविद्यालय,किनवट चे प्राचार्य डॉक्टर आनंद भंडारे, विचारवंत संशोधक डॉक्टर भगवान वाघमारे यांच्या हस्ते “असं हे सगळं” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे, उपप्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के, बळीराम पाटील कॉलेज किनवटचे डॉ. सुरेंद्र शिंदे,डॉ. सुशील प्रकाश चिमोरे, विभागीय कृषी अधिकारी किनवटचे डी.एम.तपासकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुजी शक्ती सेनेचे राज्य प्रवक्ते दयानंद कांबळे यांनी केले साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव व प्राध्यापक रामकिशन सन्मुखराव लिखित “असं हे सगळं” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा थाटात संपन्न झाला. याप्रसंगी समाज बांधव, कार्यकर्ते व प्रतिष्ठित मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.

223 Views
बातमी शेअर करा