KINWATTODAYSNEWS

साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे यांचे नातू आदरणीय सचिनभाऊ साठे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पिसादेवी येथील जनार्दन कसारे निर्घृण हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची भेट घेऊन केले सांत्वन

औरंगाबाद: जिल्ह्यातील पिसादेवी येथील मातंग समाजाचे जनार्दन कसारे या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र पडसाद उमटले. काल मानवहीत लोकशाही पक्षाचे सर्वेसर्वा प्रमुख आदरणीय सचिन भाऊ साठे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली विचारपुस केली.पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य न्याय मिळावा अशी अपेक्षा केली.पोलीस प्रशासनाने यावेळी आरोपींची गय केली जाणार नाही कठोरातल्या कठोर शिक्षा केली जाईल असे यावेळी पोलीस प्रशासनाने सकारात्मक भूमिका मांडली.
मातंग समाजाने एकत्रित राहून एकमेकांना सहकार्य करावे.सुखा दुःखात आपण सहभागी व्हावे. आण्णा भाऊ साठे यांचं कुटुंब व मानवहीत लोकशाही पक्ष पीडित कुटुंबासोबत आहे असा विश्वास त्यांना देण्यात आला.
यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.

156 Views
बातमी शेअर करा