किनवट: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किनवट विधानसभा मतदारसंघातील माहूर आणि किनवट तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या बिनविरोध निघाल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीला वीस लाख रुपये इतका विकास निधी मंजूर करणार असल्याची घोषणा आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील वर्षभरापासून प्रशासक लागू असलेल्या व मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.सप्टेंबर 2022 मध्ये पार पडणाऱ्या माहूर तालुक्यातील 24 व किनवट तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. निवडणुकांमध्ये होणारा अनाथायी खर्च टाळण्यासाठी व गावातील निवडणुका निर्विवादपणे पार पडण्यासाठी बिनविरोध निवडणुका ह्या सर्वोत्तम पर्याय असून गावातील सरपंचासह सदस्यांची पदे बिनविरोध करणाऱ्या गावांना तब्बल वीस लक्ष रुपये इतका विकास निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा आमदार भीमराव केराम यांनी केली असून जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने या उपक्रमात सहभाग घेऊन आपल्या गावाचा विकास साध्य करावा व परंपरागत होणाऱ्या भानगडी थांबवण्याचे आवाहन केराम यांनी केले. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये होणारे वाद आणि तंटे हे वर्षानुवर्षे सुरू राहतात याचे पर्यावरण एखाद्या मोठ्या घटनेत होऊन गावातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करून घेत असतात निवडणुकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतरही अशी प्रकरणे न्यायालयात वर्षानुवर्ष प्रलंबित राहते पर्यायाचे आर्थिक नुकसान वर्षानुवर्षे सहन करावी लागते. या सर्व घटना टाळण्यासाठी बिनविरोध ग्रामपंचायत हा सर्वोत्तम पर्याय असून गावातील गाव पुढाऱ्यांनी जास्तीत जास्त आपल्या गावातील ग्रामपंचायती बिनविरोध कशी काढता येईल याकडे लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त विकास निधी कसा खेचून आणता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान देखील केराम यांनी केले आहे.