KINWATTODAYSNEWS

बंजारा समाजातील तीज महोत्वस सण गोकुंदा येथे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

किनवट ता. प्र दि २२ बंजारा समाजामध्ये निसर्गाच्या पुजेचे अतोनात महत्व असुन श्रावण महिण्यामधील प्रकृतीच्या नविन रुपाची सुमारे ११ दिवस आराधना करण्याचा सण म्हणजे तीज महोत्वस हा अत्यंत उत्साहात साजरा होणारा सण गोकुंदा परिसरातील बंजारा समाज बंधावाव्दारे दिनांक २१ रोजी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला.
प्रकृती हि श्रावण महिण्यामध्ये आपली कात टाकते आणी हिरव्या रंगाची शालु संपुर्ण सृष्टीवर पांघरली जाते त्याच हिरव्या शालु मुळे निसर्गाकडुन वर्षभर चालेले असे अर्थचक्र, अन्नचक्र मानवास प्राप्त होते त्याच उपकाराची जाण राखुन निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे तीज महोत्वस जो किनवट माहुर परिसरातील बंजारा समाजाकडून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो.
तीज निमित्त बंजारा समाजातील महिला व बालिका ह्या नारळी पोर्णिमे नंतर ११ दिवसांचा गेहुंचा घट मांडला जातो ज्यामध्ये चमत्कारीक रित्या ११ दिवसात हिरवे गहु चांगल्या प्रमाणात उघवतात ज्याची पुजा ह्या महिला नित्यनेमाने करतात. अशातच वाडीतांड्यावर रोज रात्री या निमित्त पारंपारीक नृत्याचा कायक्रम आयोजित करण्यात येते. यामध्ये नाईक, कारभारी व मानकरींचे मान पाळले व जोपासले जातात तर नाईक मानकरी देखिल गाव जेवनाचे औतन देतात व जेवणावळीचे कार्यक्रम आयोजित करतात.
दिनांक २१ रोजी गोकुंदा परिसरातील बंजारा समाजाचे नाईक प्रकाश गब्बा राठोड यांच्याकडुन तीज विसर्जन कार्यक्रमा निमित्त गोकुंदा येथिल के.के मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात माजी आमदार प्रदिप नाईक यांनी उपस्थिती दर्शवुन बंजारा समाजाच्या ज्येष्ठ नाईक कारभारी व सदस्यांकडुन आशिर्वाद घेतले व पारंपारीक धार्मिक विधी पार पाडल्या यावेळी मोठ्या प्रमाणात महिला, बालीका व बंजारा समाजाचे बांधव उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्यासह राहुल नाईक, कचरु जोशी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमसिंग जाधव, गुलाब जाधव, अंकुश चव्हाण राजु राठोड यांच्यासह नाईक कारभारी, महिला, बालिकांची लक्ष्यनिय उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता ग.णु.जाधव, भारत प्रकाश राठोड, गजानन राठोड, अंकुश चव्हाण यांच्यासह गोकुंदा, किनवट परिसरातील युवकांनी अथक परिश्रम घेतले.

243 Views
बातमी शेअर करा