किनवट तालुका प्रतिनिधी:-20 ऑगस्ट रोजी
शहरातील जिजामाता चौकात ३० वर्षीय युवकास डिजीटल बॅनर लावतांना विजेचा शॉक लागून जखमी झाला होता.
तहसील कार्यलया समोरील न.प. च्या गाळ्यावर बॅनर लावतांना हिंदुस्तान प्रिन्टर येथे कामाला असलेला ३० वर्षीय शुभंम कुमरे रा. गोकुंदा या युवकास जिवंत तार कट असल्याने स्पर्श झाला व शॉक लागला होता .
जेव्हां शॉक लागला तेव्हां आरडा ओरड ऐकुन सेतु चालक रमेश राशलवार,रवी दिसलवार, भगवान भाऊ आदींनी जाऊन मदत केली त्याची मदत करून त्याच्या अगांवर पडलेला सिमेंट पोल काढला. व लाकडाच्या सहाय्याने तार हटविल्या सदरील युवकास साने गुरुजी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचार डॉ. अशोक बेलखोडे हे करीत असुन प्रकृती स्थीर आहे. अशी माहिती त्यांनी दिली सुदैवाने जीवित हानी टळली मदत करणाऱ्याचे किनवट शहरातुन व तालुक्यतून खूप कौतुक होत आहे.
डिजीटल बॅनर लावतांना लागला विजेचा शॉक,युवक जखमी; सुदैवाने जीवित हानी टळली..
194 Views