करमाळा, सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने करमाळा पोलीस ठाणेमधील पोलीस बांधव, पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे, टेंभुर्णी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे, उपनिरीक्षक यांना राखी बांधून भाऊ बहिणीचे पवित्र नाते गुंफले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन करमाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा करमाळा या संघाने गुरुवार दि.१७ ऑगस्ट रोजी करमाळा पोलीस ठाणेमधील पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्यासह ३५ पोलीस, हवालदार, उपनिरीक्षक यांना राखी बांधली. यावेळी पोलीस निरिक्षक कोकणे यांनी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करुन अनेक पोलीस बांधव आपल्या ड्युटीमुळे रक्षाबंधनाला बहीणीच्या घरी जाऊ शकत नाहीत अथवा बहिण सुदधा आपल्या भावाकडे येऊ शकत नाही, पत्रकार संघातील महिला पदाधिकारी यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून बहिण भावाचे नाते गुंफले. आपण पोलीस ठाणेकडुन या संघाला निश्चित सहकार्य करु असेही सांगितले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने करमाळा तहसीलदार समीर माने यांनाही राखी बांधली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, सदस्या माधुरी कुंभार यांनी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला.
करमाळा तालुक्यात पोलीस निरीक्षक कोकणे यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
संघाच्या वतीने पोलीस बांधव व कैदी बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष बाळासाहेब भिसे, सचिव प्रदीप पवार, जेऊर शहराध्यक्ष आबासाहेब झिंजाडे, सदस्य प्रमोद खराडे, संभाजी शिंदे, संजय चांदणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमामुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा रक्षाबंधन स्तुत्य उपक्रम : पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे
71 Views