ता. प्र.किनवट:- येणाऱ्या खरीप हंगामात व्यापाऱ्यांकडून बोगस खते व बोगस बियांणाची विक्री होऊनये यासाठी मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष अजय कदम पाटील यांनी सहायक जिल्हाधिकारी यांना ता.२ रोजी निवेदन दिले.
कोरोना व लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर आर्थीक व्यवस्था डबघाईस गेलेली आहे. त्यातच औषधे, औजारे, खते ,बियाणे अन्य वस्तु यांची भाववाड होऊन शेतकऱ्यांना आर्थीक फटका बसत आहे. यातच बियाण्यात बोगसगिरी झाल्यास संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.
198 Views