*नांदेड प्रतिनिधी प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.18.देगलूर तालुक्यातील काही जण नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना नायगावं तालुक्या मधील कुष्णूर जवळ नांदेडला जाणाऱ्या कुर्जर या वाहणाचे टायर फुटून झालेल्या अपघातात देगलूर तालुक्यातील जावई आणि सासूचा जागीच मृत्यू झाला तर आठ जन जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना नांदेडला पाठवण्यात आले जखमीपैकी दोघांची परिस्थिती नाजूक असल्याचे समजले आहे.सदरची घटना नांदेड हैदराबाद महामार्गावर कुष्णूर जवळ सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.
नांदेड येथील देगलूर नाका परिसरात एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी देगलूर तालुक्यातील गोनेगाव व देगाव येथील नातेवाईक के ए ३२ एम ६४३२ या या क्रमांकाच्या क्रुजर जीपमध्ये बसून जात होते. मात्र सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान नांदेड हैदराबाद महामार्गावर कुष्णूर जवळ या क्रुजर जिपचे समोरील टायर फुटल्याने जिप पलटी खाली. यात शेख महेबूब बाबू शेख (४०) व अहेमदबी शेख खुदबोद्दिन शेख (५५) या जावई व सासूचा जागीच मृत्यू झाला तर पिरसाब नवाबसाब शेख( ६५) गोनेगाव,खाज्या मगदूम शेख (४५),फरजना खाज्या शेख (४०),देगाव, खुदबोद्दीन नवाज साब (६०), देगाव,घाशी साब बाबूसाब शेख गोनेगाव चालक (५५), शादुल बाबूसाब शेख गोनेगाव(४५), आजमिर महेबूब शेख गोनेगाव( ४०),खाज्या साब मौलासाब शेख (४५) हैदर इस्माईल साब शेख गोनेगाव( ४०) अदि आठ जन जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
सदरील अपघाताची माहिती समजताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी, पोलीस उप निरिक्षक दिनेश येवले व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघात झाल्यानंतर अनेक जखमी कुणाच्याही मदतीची वाट न बघता मिळेल त्या वाहनाने नांदेड गाठले काही जखमी शासकीय रुग्णालयात तर काहीजन खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघात घडल्यानंतर मदतीसाठी कमी पण फक्त फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.