नांदेड /प्रतिनिधी:नांदेड जिल्हाचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची बदली नागपुर येथे झाली असून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नागपूर या पदावर करण्यात आल्याचे आदेश आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांनी काढले आहेत. नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीम. विमला आर. यांच्या यांच्या जागी डॉ. विपीन यांची बदली करण्यात आली आहे. सध्याचा कार्यभार विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी दिले आहेत. विपीन इटणकर यांनी 17 फेब्रुवारी 2020 रोजी नांदेड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता.
85 Views