KINWATTODAYSNEWS

तालुकास्तरीय कार्यक्रमात 5 हजार 370 विद्यार्थ्यांनी केले समूह राष्ट्रगीत गायन #तालुक्यातील 68486 जणांचा सहभाग

किनवट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत “तालुका स्तरीय समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात” गोकुंद्यातील 10 शाळांमधील 5 हज़ार 370 विद्यार्थी व 300 शिक्षकांनी गाईले राष्ट्रगीत.

बुधवारी (ता.17) सकाळी11 वाजता महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे पंचायत समिती , किनवटच्या वतीने “समूह राष्ट्रगीत गायन ” तालुकास्तरीय मुख्य कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आमदार भीमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार(भाप्रसे), तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, माजी सभापती प्रतिनिधी दत्ताआडे , माजी पं.स. सदस्य निळकंठ कातले , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड , अभि. प्रशांत ठमके , केंद्र प्रमुख रमेश राठोड, अनिल तिरमनवार उपस्थित होते .
उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र जाधव यांनी आभार मानले. सिमरन शेख अजिमोद्दीन, पुनम परसराम राठोड, निशा परसराम राठोड यांनी देशभक्ती गीते सादर केले. वेदिका सुनिल अनंतवार हिने जोषपूर्ण भाषण केले. सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार व आमदार भीमराव केराम यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 9 ऑगष्ट पासून सुरू झालेल्या विविध उपक्रमांचा समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाने समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य शेख हैदर, उपप्राचार्य सुभाष राऊत , उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक संतोषसिंह ठाकूर , किशोर डांगे व प्रमोद मुनेश्वर यांचेसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

चौकट
• तालुक्यातील 379 शाळांमधील 48022 विद्यार्थी व 1849 शिक्षक कर्मचारी
• 453 अंगणवाड्यातील 10959 चिमुकली
• 7 महाविद्यालयातील 210
• 41 शासकीय , निमशासकीय अस्थापनेतील 2050
• 3 केंद्र शाषित अस्थापनेतील 115
• 370 नोंदित , अनोंदित प्रतिष्णातील 1020
• 730 सेवापुरवठा धारकातील 1460
• 375 महिला बचत गट , स्वयंसेवी संस्था , धर्मदाय आयुक्तांकडे व इतर कायद्यान्वये नोंदणीकृत संस्था मधील 4500
• 50 इतर मधील 110 जण
अशा प्रकारे तालुक्यातील एकूण 2408 अस्थापना, प्रतिष्ठाणांतून 68486 जणांनी ‘समूह राष्ट्रगीत गायन ‘ मध्ये सहभाग घेतला .

चौकट
” आप सर्व लहान मुलं देशाचं भवितव्य आहात. पुढील 25 वर्षे देश कसा व कोणत्या दिशेनं न्यावा हे आपणावर अवलंबून आहे. शिक्षकांच्या सूचना पाळा , जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य पाळा , राष्ट्रहित जपा .
-कीर्तिकिरण पुजार (भाप्रसे),
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी, किनवट “

” यावर्षी आपण पारंपरिक सणाप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. शिक्षणाच्या माध्यमातून उद्याचं आपलं भवितव्य राष्ट्राच्या जडनघडणीसाठी अपेक्षित आहे. गुरुजनांच्या शैक्षणिक संस्कारांचं अनुसरन करून बलशाली राष्ट्र उभ करण्यासाठी म्हणून देशाच्या सर्व बाजूंनी प्रगती , उन्नतीसाठी आपलं योगदान असावं .
-भीमराव केराम ,
आमदार , किनवट “

64 Views
बातमी शेअर करा