माहूर: तालुक्यात असलेल्या सायफळ या गावांमध्ये काही दिवसांपूर्वी दलित वस्ती योजनेतून सिमेंट रोडचे काम करण्यात आले आहे. सायफळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजीक शेख यांनी दिनांक 17.8.2022. रोजी सायफळ येथील ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे की माहूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सायफळ या गावांमध्ये दलित वस्ती योजनेतून सिमेंट रोडचे काम सुरू आहे. हे सिमेंट रोड निष्कृष्ट दर्जाचे असून यात वापरणारा मटेरियल पण निकृष्ट आहे.
सदरील ठेकेदाराने निष्कृष्ट काम केला असून शासनाची फसवणूक केली आहे. सदरील रस्त्यावर बनवत्या वेळेस खाली ढबर न टाकता डायरेक्ट कॉक्रेट सिमेंटचे माल ओतले आहे. संबंधित अधिकारी यांनी सदर रस्त्याची चौकशी करण्यात यावी.असले निवेदन पत्रकार तथा राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजीक शेख यांनी दिले आहे…
सायफळ येथे सुरू असलेला सिमेंट रोड ठेकेदारानी निष्कृष्ट केला आहे याची गटविकास अधिकारी याच्या कडे तक्रार..
72 Views