KINWATTODAYSNEWS

नांदेड मध्ये १५ हजार विद्यार्थ्यांसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले राष्ट्रगीताचे उत्स्फूर्त गायन

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.17.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील श्री गुरू गोविंदसिंगजी स्टेडियमवर यासाठी भव्य आयोजन करण्यात आले.

नांदेड येथील सुमारे 15 हजार विद्यार्थी व अधिकारी कर्मचारी यात उस्फुर्त सहभागी झाले.

सकाळी नियोजनाप्रमाणे अकरा वाजता राष्ट्रगीत गाण्यात आले. यावेळी महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार,मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने,अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे,अनुराधा ढालकरी,जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुकाबले, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, सविता बिरगे,स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, यांची उपस्थिती होती.

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून 75 अंक आकार साकार केले. यात 120 फुट लांबीचा तिरंग्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. एकूण 60 शाळांमधील 15 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

याप्रसंगी राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे 34 जवानांसह 2 हजार 972 अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. किड्स किंग्डम शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड बासरी सह समूह राष्ट्रगीत गायन सादर केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी,उपविभागीय अधिकारी विकास माने,तहसिलदार किरण अंबेकर यांनी सर्व शाळांशी समन्वय साधून नियोजन केले. नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी,शिक्षणाधिकारी सविता बिरगे,उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर,प्रलोभ कुलकर्णी, संजय भालके,यांच्यासह तहसिलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी,तलाठी,कार्यालयीन कर्मचारी यांनी यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

55 Views
बातमी शेअर करा