*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.18.जिल्यातील मुदखेड तालुक्या मधील बारड पोलीस ठाणे हद्दीतील बारडवाडी रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी घडली होती.
मात्र आरोपींचा शोध लागला नव्हता त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने आपले पथक नेमून आरोपीस शोधून काढले असता धक्कादायक माहिती समोर आली असून जन्मदात्या आईनेच मुलाच्या त्रासाला कंटाळून भाडेकरूच्या मदतीने आपल्या पोटच्या मुलाचा खून केल्याचे सांगितले आहे.
मौजे बारड शिवारात दिनांक 14 ऑगस्ट रोजी सुशिल त्र्यबकराव श्रिमंगले याचा अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरुन खुन केला होता. त्यामुळे पोलीस ठाणे बारड येथे गुरनं. 60/2022 कलम 302 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा,नांदेड यांनी पथके तयार करुन नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे सुरु केले.
17 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकव्दारकादास चिखलीकर यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, गुन्हयातील मयताचा खुन हा मयताची आई सौ.शोभा त्र्यंबकराव श्रीमंगले यांनी इतर दोन व्यक्तीना सोबत घेवुन केला आहे.
अशी माहीती मिळाल्यावरुन पो.नि.स्थागुशा यांनी सदरची माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशाचे अधिकारी व अमलदार यांना रवाना करुन सदर गुन्हयातील संशयीत महीला नामे सौ. शोभा त्र्यबकराव श्रीमंगले वय 55 वर्ष व्यवसाय घरकाम रा गितानगर नांदेड यांना ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता,त्यांनी सदर गुन्हयातील त्यांचा मुलगा (मयत) नामे सुशिल हा नेहमी तिला व तिचे पतीला मारहाण करुन त्रास देत असल्या कारणाने तिचे घरी भाडयाने राहणारा राजेश गौतम पाटील व त्याचा मित्र विशाल देवराव भगत यांना सुशिल याचा खुन करण्यास सांगीतले होते.
त्यावरुन स्थागुशाचे पथकाने राजेश गौतम पाटील वय 27 वर्षे रा.गितानगर,नांदेड व विशाल देवराव भगत वय 27 वर्षे रा. महेबुबनगर,नांदड यांना ताब्यात घेवुन सदर गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवुन विचारणा केली असता, सदर खुन त्यांनी शोभा श्रीमंगले यांचे सांगण्यावरुन केल्याचे सांगीतले आहे.नमुद तिनही आरोपीतांना सदर गुन्हयाचे पुढील तपासकामी पो. स्टे. बारड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक भोकर विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड निलेश मोरे,व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली,सपोनि / पांडुरंग माने, शिवसांब घेवारे, पोउपनि / सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे, पोहेकॉ / मारोती तेलंग, गुंडेराव करले, पोना/ विठल शेळके,पोकों / देवा चव्हाण, मोतीराम पवार, मपोकॉ / महेजबीन शेख,चा पो कॉ / हनुमानसिंग ठाकुर,शेख कलीम यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा.पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे