देगलूर: आज दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी मौजे मंडगी ता. देगलूर जि. नांदेड येथे लोकनेते, दलित मित्र पुरस्कार प्राप्त, गरिबांचा जाणते नेते स्व. संभाजी मंडगीकर साहेब ( मा. जि. प. अध्यक्ष नांदेड) यांची 86 वी जयंती त्यांच्या जन्मभूमीत अतिशय थाटामाटात आणि उत्साहाच्या वातावरणात संपूर्ण मंडगी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक जूनी जाणती, प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. सर्वप्रथम स्वर्गीय संभाजी मंडगीकर साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लोकनेते संभाजी मंडगीकर साहेब यांचे चिरंजीव श्री राजेंद्र मंडगीकर (माजी सरपंच ग्राम मंडगी) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर स्वर्गीय संभाजी मंडगीकर साहेब यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. एवढेच नाही तर त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणत गावची जिल्हा परिषद शाळा ही तालुक्यामधील गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून कार्यरत असल्याबाबत सर्व गुरुजनांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. सर्व गुरुजनांना _पुण्याई_ हा मंडगीकर साहेब लिखित काव्यसंग्रह भेट देण्यात आला ,त्यांचा फेटे बांधून शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी लोकनेते स्वर्गीय संभाजी मंडगीकर यांच्या आठवणी जाग्या केल्या. त्यात प्रामुख्याने मा.सय्यद सर ,मा. सय्यद मोहियोद्दीन मा. डॉक्टर मिलिंद शिकारे, मा. साखरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाला बाहेरगावचे व अन्य प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री सूर्याजी पाटील भक्तापूरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. सय्यद सर (माजी मुख्याध्यापक जि. प. हा.देगलूर ) मा. सय्यद मोहियोद्दीन (अध्यक्ष, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक ता. देगलूर) मा. डॉ. मिलिंद शिकारे मा. मारोती बोडावार सर, मा. संजय कळसकर सर, मा. रमेश गाडगे सर, मा. विश्वनाथ साखरे सर, मा. बसवलिंग स्वामी सर हे होते ते या कार्यक्रमास प्रा.देविदास गायकवाड, इरवंत माडपते, प्रकाश गायकवाड, योगेश्वर गायकवाड, गंगाधर गायकवाड, मनोहर वाघमारे, निळकंठ शहापूरकर,तंटामुक्ती समिती अध्यक्ष हणमंतराव पाटील , मा. सरपंच गणेश पाटील , माणिकराव पाटील, यादवराव पाटील ,संभाजी पाटील( पोलीस पाटील मंडगी) शरफोदीसाब राचयअप्पा मठपती
राजेंद्र गुरुजी, प्रकाश पाटील, माधवराव कोंदापुरे, दिलीप लोणे, अण्णा गायकवाड, लालु मनहिंदे हणमंत मंडगीकर, धोंडीबा गायकवाड, बाबू गायकवाड आणि अनिल गायकवाड निखिल गायकवाड,नितेश मंडगीकर, बालाजी गायकवाड,प्रविण गायकवाड,तुकाराम गायकवाड, लिंगुराम गायकवाड,बालाजी गायकवाड,दिलीप गायकवाड,रामा लोणे यांच्या सह गावातील व परिसरातील नागरिक उपस्थित होते आभार प्रदर्शन सुर्यकांत गायकवाड यांनी मानले
लोकनेते स्व. संभाजी राचन्ना मंडगीकर यांची 86 वी जयंती मंडगी येथे उत्साहात साजरी
424 Views