किनवट/प्रतिनिधी: मराठा आरक्षणासाठी अहोरात्र झटणारे व सर्वसमावेशक लढवय्ये नेते स्व.विनायकराव मेटे आपल्यातून अपघाती निधनाने निघून गेले. महाराष्ट्रासाठी ही फार मोठी हानी असून, ही पोकळी कधीही भरून निघणार नसल्याची प्रतिक्रिया किनवट येथे श्रद्धांजलीपर कार्यक्रमात आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केले.
शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन आरमाळकर यांनी रविवारी दि.१४ रोजी शहरातील जिजामाता चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपचे शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, भाजपा नेते आनिल तिरमनवार, तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, सुधाकर भोयर, जयवंत चव्हाण, बाळकृष्ण कदम, अजय कदम, शैलेश गटलेवार, सचिन कदम, अमरदीप कदम, संतोष धोंडगे, शिवा आंधळे, उत्तम जाधव, विनायक जाधव, आकाश इंगोले, अनिल कराळे, वैजनाथ करपुडे पाटील आदी सर्व समाजातील, सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते
मराठा आरक्षणासाठी अहोरात्र झटणारे व सर्वसमावेशक लढवय्ये नेते स्व.विनायकराव मेटे यांच्या निधनाने मोठी पोकळी -आ.भीमराव केराम
90 Views