KINWATTODAYSNEWS

स्वच्छता ही सेवा;इरादा’स्वच्छ जनजागृती रॅली..!

*जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी उत्स्फूर्त प्रतिसाद*

जालना: स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे.सी.जी.यांच्या प्रमुख उपस्थित स्वच्छता अभियान रॅलीला पिंपरी फाटा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.ठिकठिकाणी नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रत्यक्ष सहभाग घेतला.यावेळी पिंपरी फाटा येथे विद्यार्थांनी स्वातंञ्यविरांच्या आठवणींना उजाळा दिला.””भारत माता की जय”” “”वंदे मातरम”” “उंच धरा रे उंच धरा, तिरंगा आपला उंच धरा”,”स्वच्छ भारत,सुंदर भारत.” “”हर घर तिरंगा,घर घर तिरंगा,”भारत माता की जय,वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे.सी.जी.यांनी स्वच्छतेचे महत्व ते म्हणाले की स्वच्छता ही सेवा आहे परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे.

“स्वच्छ भारत”
चला करुया आपण परिसराची स्वछता,
घेऊया न कचरा करण्याची दक्षता.
ठेऊया परिसर नेहमी योग्य,
तरच मिळेल निरोगी आरोग्य.
खरच होईल का परिसर स्वछ?
ज्यांच्या मनात आहे विचार तूचछ !
आधी करुया स्वच्छता मनाची,
तरच होईल निर्मिती स्वच्छ व सुंदर समाजाची .
करुया केरकचरा व पलास्टिकची विल्हेवाट,
तरच मिळेल स्वच्छतेला मोकळीक वाट.
सुरु झालय स्वच्छतेच आशादायी अभियान,
होतय हळुहळु कमी कचरयाच प्रमाण.
चला घेऊया झाडू प्रत्येकाच्या हाती ,
करुया आपल्यया परिसराची प्रगती.
तरच होईल सशक्त भारताची निर्मिती,
कारण स्वच्छताच हिच खरी संपति !!!
तसेच शाळेच्या स्वच्छता विभाग प्रमुख श्रीमती.एस.आर.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता,प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन गाव व परिसर स्वच्छतेची मोहीम जनजागृती करण्यात आली.व त्यांनी विद्यार्थी तसेच सर्व सहभागी नागरिकांचे कौतुक केले.व सर्वांना स्वातंञ्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्या दिल्या.व यावेळी उपस्थित गावतील ग्रामस्थ व शाळेचे मुख्याध्यापक.सी.जी.वाघमारे.व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद श्रीमती.एस.आर.कुलकर्णी.,
श्री.वाय.बी.मदन.,
श्री.डी.एन.सोनकांबळे.,
श्री.पी.पी.नागरे.,
श्रीमती.ए.बी.देशपांडे
श्री.एल.बी.जाधव,
श्री.आर.एस.ठाकरे,
श्री.एस.बी.राऊत,
श्रीमती.एम.ए.खरात आदिची उपस्थिती होती

164 Views
बातमी शेअर करा