KINWATTODAYSNEWS

नाबार्डच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानात गृहलक्ष्मी महीला ग्राम विकास संस्थेचे योगदान मोलाचे- मा.किर्तिकिरण एच. पुजार( प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी ए.आ.वि.प्र. किनवट)

किनवट ता. प्रतिनिधी:-
भारताला स्वातत्र्यं मिळुन ७५ वर्ष पुर्ण होत आहे यंदाचे वर्ष हे अमृत महोत्सवाच आहे मन की बात कार्यक्रमातुन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या अभियानाला भारतभरातुन प्रतिसाद मिळत आहे याचाच एक भाग म्हणुन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा.किर्तीकिरण एच. पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली गृहलक्ष्मी महिला ग्राम विकास संस्था किनवटच्या महिला बचत गटाच्या महिलांनी २०००राष्ट्रध्वज शिवल्याबद्दल मा.किर्तीकिरण एच. पुजार सहायक जिल्हाधिकारी यांनी बचत गट महीलांचे कौतुक केले.
हर घर तिरंगा अभियान व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे त्यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डयांच्या ४१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी रुपेशजी दलाल यांनी मार्गदर्शन केले व नाबार्डची कारकीर्द सांगितली बचत गटानां कर्ज वाटप केले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहलक्ष्मी महीला ग्रामविकास संस्थेच्या संचालिका संगीता पाटील यांनी केले. सरस्वती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुनील व्यवहारे यांनी किनवट या आदिवासी दुर्गम भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग व विविध गृह उद्योगातूनआपल्या वस्तू व खाद्यपदार्थह्या विदेशापर्यंत जाऊन त्यांची मागणी विदेशातून सुद्धा व्हावी असा मानस बोलून दाखविला तर पंढरीनाथ ठाकरे यांनी महिला बचत गट यांनी आर्थिक नियोजन कसे करावे बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा उपयोग कशाप्रकारे करावा याचे महत्त्व सांगितले .
या कार्यक्रमात राधा बोलेनवार यांचा व ज्या ज्या महिलांनी झेंडे शिवले त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यकमाचे सुत्रसंचालन राजेश पाटील यांनी केले तर आभार आत्मानंद सत्यवंश यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा गिरे (सरपंच मदनापुर), राधा बोलेनवार, रुचीता फुलझेले , आदींनी सहकार्य केले.

ठळक मुद्दे:
बचत गटाच्या महीलांनी स्वत:२००० झेंडे शिवले
सहायक जिल्हाधिकारी/प्रकल्पाधिकारी यांना केले सुपुर्द
बचत गटाच्या महीलांनी नोंदवला सक्रीय सहभाग
या दरम्यान महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे मुख्य शाखा अधिकारी रुपेश दलाल यांच्या उपस्थितीत महीला बचत गटांना JLG/SHG कर्ज वितरण करण्यात आले.
एम जी बी शाखा अधिकारी रुपेश दलाल, सरस्वती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुनिल व्यवहारे, बीसी पंढरीनाथ ठाकरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले .

105 Views
बातमी शेअर करा