KINWATTODAYSNEWS

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हाव्दारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन

किनवट (आनंद भालेराव)दि.3
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच राज्यातील ओबिसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकिय आरक्षण एका आदेशाव्दारे रद्द केले त्याविरुध्द भारतीय जनता पक्षा तर्फे राज्य शासनाच्या विरुध्द राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले त्या अणुषंगाने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हाव्दारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाव्दारे निवेदन करण्यात आले.

       राज्य शासनाने सदर प्रकरणी ओबीसींची बाजु न्यायालयात योग्यरित्या मांडली नसल्याने ओबीसींचे राजकिय आरक्षण गेल्याचा आरोप यावेळी सादर केलेल्या निवेदनात भाजपा तर्फे करण्यात आला असुन मागील १५ महिण्यात न्यायालयाने दहा ते बारा तारखा दिल्या या संदर्भातील खटल्या प्रकरणी परंतु राज्य शासनाने या प्रकरणाला शुल्लक समजुन योग्यती पाऊले उचलली नसल्याने आज ओबीसी आरक्षण रद्द झाले असुन यामुळे राज्यातील ओबीसी समाज हा यापुढे राजकिय आरक्षणाला मुकणार आहे. असे हि निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

       डॉ बाबासाहेबांनी आंबेडकरांनी दिलेले आरक्षण जो पर्यंत ओबीसी समाजाला पुन्हा प्राप्त होत नाही तो पर्यंत भाजपा लढाई लढेल व त्याकरीता रस्त्यावर उतरेल अशी चेतावणी हि सादर निवेदनाव्दारे देण्यात आली आहे.

       तर निवेदनावर आमदार मा.भिमराव केराम, राम नागरे   जिल्हा प्रभारी, बाबुराव केंद्रे जिल्हाध्यक्षभाजपा ओबीसी मोर्चा नांदेड जिल्हा, संदिप केंद्रे ता. अध्यक्ष भाजप किनवट       , आनंद मच्छेवार नगराध्यक्ष किनवट, फेरोज तंवर माजी शहराध्यक्ष भाजपा किनवट, श्रीनिवास नेम्मानिवार शहराध्यक्ष भाजपा, शेखर चिंचोळकर ता. अध्यक्ष ओबीसी मोर्चा, गोविंदराव अंकुरवार जिल्हाध्यक्ष आ.आघाडी, कपिल करेवाड उपसभापती प.स, दत्ता आडे माजी सरपंच, निळकंठ कातले      सदस्य, प.स किनवट, शिवा क्यातमवार शहराध्यक्ष ओबीसी मोर्चा भाजपा किनवट, विवेक केंद्रे, विभिषण पाळवदे, स्वागत आयनेनीवार, संतोष म्हरस्कोल्हे, शिवा आंधळे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

93 Views
बातमी शेअर करा