KINWATTODAYSNEWS

स्वातंत्र्यदिनी रमेश राशलवार यांचा आत्मदहनाचा इशारा

किनवट = (ता.प्र.) किनवट नगर परषिदेव्दारा बेल्लोरी किनवट येथील पुरग्रस्त मातंग समाजाला गत २० वर्षापासुन नियोजित वस्तीवाढ राखीव क्षेत्र मौजे किनवट बेल्लोरी येथील भू. क्र १३०/१ क्षेत्रफळ ०.४९ आर जमीन न.प.च्या ताब्यात घेण्यात आली. परंतु पात्र पुरग्रस्त मातंग समाजाला वस्तीसाठी प्लाटींग वाटप न करता खोटया आश्वासने देत वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे राशलवार यांनी असा इशारा दिला आहे की, १५ आगष्टपर्यत ह्या मागणीचा विचार न झाल्यास त्याच दिवशी कुठल्याही प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असे दिलेल्‍या निवेदनात नमुद केले आहे.
गत २००२ पासुन ते आज पर्य्यंत हया समाजाला दरवर्षी महापूराचा तडखा बसून अन्न‍ धान्य व घराची नासधूस होऊन जिवण मरण्याची कसरत करावी लागत आहे. गेल्या २० वर्षापासून न.प. प्रशासन संबंधीत पूरग्रस्त मांतग समाजाला २००२ ला आश्वासन दिले होते कि, नियोजित वस्तीवाढ करु प्लाटींग करुन वस्ती स्थलांतरीत करणार असे लेखी आश्वासन दिले असे अनेक आश्वासनाचे लेखी प्रत आजही उपलब्ध आहेत. लोकशाही मार्ग्गानेे कित्येकवेळा आमरण उपोषण व आंंदोलने केली. प्रत्येक वेळी लोक प्रतिनीधिंंनी व न.प प्रशासनाने आश्वासन देत पुरग्रस्त मांतग दलित समाजाला दिशाभूल केले आहे. सदर प्रकरणात किनवट बेल्लोरी येथील भु क्र १३०/१ क्षेत्रफळ ०.४९ आर जमिन आरक्षीत करण्यात आली सदर जमिनीत दलितवस्ती ऐवजी जनवरांंचे व मानसाचे विष्टाराने भरलेला दिसतो मग हा आमच्य्या दलित समाजावर अन्याय नाही का? असा सवाल देखील त्यांंनी केला आहे. करीता हया समाजाला न्याय मिळावा म्हणून दिनांक १५/८/२०२२ पर्यंत हया मागण्य्याची पूरतर्ता करावी अन्यथा नाईलाजास्तव आक्रमक भुमिका घेण्यात येईल. असेही त्यांंनी सादर केलेल्या निवेदनात उल्ल्लेख केला आहे. सदर प्रकरणात काही मानसिक व शारीरीक नूकसान झाल्य्यास संपूर्ण जबाबदारी न.प. प्रशासनावर राहील असे रमेेेश राशलवार त्यांंनी सादर केलेल्य्या लेेेखी निवेदनात दिले
आहे.

72 Views
बातमी शेअर करा