किनवट /तालुका प्रतीनीधी:
किनवट तालुल्यातील मोठी बाजार पेठ म्हणुन परिचीत असलेल्या सारखनी येथे दि.३१ में रोजी भोकर येथील अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या विषेश पथकाने धाड मारुन ७०,००० हजार रुपयाचा अवैध गुठखा जप्त करुन मोठी कार्यवाही केल्याने गुटखा तस्करांचे धाबे दनानले असले तरी माञ हाके च्या अंतरावर असलेल्या सिंदखेड पोलीसांची कार्यप्रनाली माञ हाप्ते द्या आणी काही करा असी असल्याचे विदारक चिञ दिसुन येत आहे…
या बाबत सविस्तर वृत्त असे कि किनवट तालुक्यातील मौजे सारखनी येथे दि. ३१ में २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आरोपी इदरीस कादर छायटीया वय ४५ वर्ष रा.सिंदखेड ह.मु.सारखनी ता.किनवट याच्या घरारच्या बाजुस भाड्याने घेतलेल्या घरात विक्री करण्याच्या उद्देशाने साठुन ठेवलेल्या प्रिमीयम नजर किंमत अंदाजे ४२००० हजार रुपये व एन.०५ प्रिमीयम जाफरानी टोबॅको गुटखा किमत अंदाजे २५४६१ रुपये असा एकुण ६७४६१ रुपयाचा अवैध गुटखा जप्त करण्यात भोकर येथील अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या पथकाला यश आले असुन धाड टाकताच आरोपी माञ पोलीसांना गुंगारा देवुन बिनधास्त पने फिरत असल्याचे विदारक चिञ पहावयास मिळत आहे.
सारखनी पासुन १२० किलो मिटर अंतरावर असलेल्या भोकर येथील पथक येवुन अवैध गुटखा पकडु शकतात माञ हाकेच्या अंतरावर असलेल्या व स्वताहला सिंघम समजानार्या सिंदखेड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांना माञ आपल्या कार्यक्षेञात चालु असलेल्या अवैध गुटखा,अवैध मटका,दारुचे महापुर हे दिसत नाहीत का असा प्रश्न सुज्ञ नागरीकांना पडला आहे.
विस्वसनीय सुञा कडुन मिळालेल्या माहीती नुसार सिंदखेड पोलीसांना दरमहा हाप्ता द्या ,खुशाल अवैध धंदे चालवा या म्हणी प्रमाणे सिंदखेड पोलीस बनले अवैध धंदेचालकाचे बटीक तसेच कोवीळ संकटात माञ सिंदखेड पोलीसांची चांदी होत असल्याचे दिसुन येत आहे.
सदर प्रकरणातील आरोपी इदरीस कादर छायटीया हा गुटखातस्करीत सराईत असुन या पुर्वी मांडवी,सह सिंदखेड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असुन गुन्हे दाखल झाल्या नंतर स्थनीक पोलीसांना हाताशी धरुन कशी पळ वाट काढायची यात तो पटाईत आहे,या ही गुन्ह्यात तो त्याच मार्गाचा वापर करुन बाहेर पडेल व पुन्हा तोच मार्ग धरेल यात काहीच शंका नाही, आरोपीने महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेल्या व लोकांचे जिवीतास अपाय कारक असलेल्या पान मसाला व गुटखा विना परवाना चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या हेतुन बाळगलेला मिळुन आला व नांदेड येथील अन्न सुरक्षा विभागाचे अधीकारी येवु न शकल्याचे कारण दाखवत शेवटी घटनेच्या दोन दिवसा नंतर सिदखेड येथील उप निरीक्षक जयसिंग अंबु राठोड यांच्या फिर्यादी वरुन गुरनं.७४/२०२१ कलम ३२८,२७२,१८८ भादवी व अन्न सुरक्षा मानके अधीनियम २६ (२) (१),३० (२) A नुसार सिंदखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके हे करित आहे.